Homeताज्या बातम्याबीड

नवीन पाणीपुरवठा टाकीच्या स्लॅबचे उद्घाटन

नगर परिषद किल्ले धारूर यांच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा टाकीच्या स्लॅबचे उद

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड
बीडच्या विकास प्रश्नी डॉ.योगेश क्षीरसागरांनी घेतली पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट-अग्निशामक दलासाठी 2 वाहने मिळणार-रस्ते, शेतीसह प्रलंबित कामांवरही चर्चा
एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छतापरिवहन मंत्री प्रताप सरनाईक : राज्यभर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ



नगर परिषद किल्ले धारूर यांच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा टाकीच्या स्लॅबचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, सर्व नगरसेवक, गुत्तेदार, अभियंते, कर्मचारीवर्ग तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. किल्ले धारूर शहरातील नागरिकांना भविष्यात पाणीपुरवठ्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कुंडलिका योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन व नवीन पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज स्लॅबच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी संयम राखून नगर परिषद किल्ले धारूर यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छांसह करण्यात आला.

COMMENTS