Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

13 वर्षीय मुलगी गभर्वती, गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः लग्नाचे आमीष दाखवून राहत्या घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आह

भोंग्यावरून मनसे पुन्हा आक्रमक; प्रकाश महाजन यांच्याकडून कारवाईची मागणी
पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
पुण्यात पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे/प्रतिनिधी ः लग्नाचे आमीष दाखवून राहत्या घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 ते जून 2022 मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ओळखीच्या 19 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर सहा महिने लैंगिक अत्याचार केले. या दरम्यान मुलीला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. ही सगळी माहिती मिळताच मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.  दोघेही एकाच परिसरात राहयला होते. दोघांची अनेक वर्षांपासून मैत्री होती. मुलाने 13 वर्षीय मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला होता. त्यावेळी तिला प्रेम असल्याचे सांगितले आणि लग्न करण्यासंदर्भात जबरदस्ती केली. मुलगी 13 वर्षाची असल्याने मुलीच्या अज्ञातपणाचा त्याने फायदा घेतला. तिच्यावर लैंगिक संबंध ठेवले.  त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेकदा राहत्या घरी नेऊन तिचा लैंगिक छळ केला.  हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागले. त्यावेळी आईने मुलीला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. यात धक्कादायक रिपोर्ट समोर आला. मुलगी 28 आठवडे गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आले. हे ऐकून आईला धक्का बसला आणि आईने मुलीकडे विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर आईने थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल विवाह करणे हा गुन्हा असतानादेखील बालविवाह करुन दिल्याने 13 वर्षीय मुलगी गर्भवती राहिती होती. पुण्यातील चाकण परिसरातून ही घटना समोर आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मे 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खेड तालुक्यात घडला होता. या संदर्भात महिला कर्मचार्‍याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पीडित मुलीचा पती राहुल शिवाजी भले यांच्यावर पॉक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

COMMENTS