Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ

जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

लातूर प्रतिनिधी - राज्य शासनाने 1 जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आ

एकरी 100 टन ऊसाचे उत्पादन घेणार्‍या महिला शेतकर्‍यांचा सन्मान होणार : संगीता साळुंखे
स्वाभिमानीने कराड-वाळवा तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली
शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी

लातूर प्रतिनिधी – राज्य शासनाने 1 जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाला शासनाने निधी दिला असून आतापर्यंत 12 हजार 449 लाभार्थ्यांच्या खात्यावर 56 लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. निधी वाटपात चाकूर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील लाभार्थी अधिक असून इतर तालुक्यात कामाला गती येण्याची गरज आहे.
लातूर जिल्ह्यात शेतकरी लाभार्थी 52 हजार 943 इतकी आहेत. यात त्यांच्या कुटुंबालील लाभार्थी संदस्यांची संख्या 2 लाख 48 हजार 670 आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा दीडशे रूपयांप्रमाणे कुटुंब प्रमुख महिलेच्या नावाने रक्कम द्यायची आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थीच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपासून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अजूनही जवळपास 32 टक्के लाभार्थ्यांनी अर्जही भरून दिले नाहीत. शिवाय, ज्यांनी दिले त्यांची डाटा एन्ट्री तालुकास्तरावर केली जात आहे. जिल्हास्तरावर आलेल्या यादीत सर्व पडताळणी करून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हजार 449 कुटुंबियांच्या खात्यावर जवळपास 56 लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.यात सर्वाधिक लाभार्थी चाकूर तालुक्यातील आहेत. लातूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून असे दोन टप्प्यात सहा महिन्यांचे धान्याऐवजी रक्कम देण्यासाठी पुरवठा विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी 150 रूपयांप्रमाणे अडीच लाख लाभार्थ्यांना सहा महिन्यांची रक्कम मिळणार आहे. यासाठी 23 कोटी 68 लाखांचा निधी पुरवठ्याकडे आला आहे. चाकूर तालक्यात सर्वाधिक 3977 जणांच्या खात्यावर 17 लाख 89हजार 650 रूपयांची रक्कम वर्ग झाली आहे. तालुकास्तरावर अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे डाटा एन्ट्री गतीने होत नाही. शिवाय, 30 टक्के लाभार्थ्यांनी अजून अर्जही दाखल केले नाहीत. तहसीलस्तरावर जवळपास 68.29 टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 48.89 टक्के अर्जाची डाटा एन्ट्री केली आहे. 12 हजार 449 लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्याचे 56 लाख 1 हजार 900 रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

COMMENTS