Homeताज्या बातम्या

धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे/प्रतिनिधी ः धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंग, बालल

भाजप आमदार भांगडियाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
सफाई कामगारांचे मोठे योगदान ; नगराध्यक्ष कदम
तर, देशातून लोकशाही गायब होईल – उद्धव ठाकरे

पुणे/प्रतिनिधी ः धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रेम चंदू पवार (वय 29, रा. घोटावडे फाटा, पिरगुंट ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. तक्रारदार मुलगी पीएमपी बसने प्रवास करत होती. आरोपी पवारने मुलीशी लगट केली. माझ्याशी मैत्री करशील का. आपण कॉफी प्यायला जाऊ, असे सांगून त्याने मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पवारने पुन्हा मुलीचा पाठलाग केला. पीएमपी बसमधून प्रवास करणार्‍या मुलीशी लगट करुन तिचा विनयभंग केला. मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पवारला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

COMMENTS