Homeताज्या बातम्यादेश

बीबीसी विरोधातील कारवाई तिसर्‍या दिवशीही सुरू

नवी दिल्ली ः ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयात प्राप्तिकर विभागाने छापे टाकले असून, गुरुवारी त

धक्कादायक ! हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून केली 2 भिकाऱ्यांची हत्या I LOKNews24
जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
*प्राणवायु निर्मिती प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करा: जिल्हाधिकारींचा आदेश | माझं गावं, माझी बातमी*

नवी दिल्ली ः ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयात प्राप्तिकर विभागाने छापे टाकले असून, गुरुवारी तिसर्‍या दिवशीही देखील कारवार्ई सुरूच होती. कारवाई सुरू झाल्यापासून दिल्ली कार्यालयातील 10 वरिष्ठ कर्मचारी घरी गेलेले नाहीत. मंगळवारपासून आयकर विभाग बीबीसी कार्यालयात तपास करत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी कर्मचार्‍यांकडून आर्थिक डेटा गोळा केला. अधिकार्‍यांनी सांगितले की, दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात मंगळवारी सकाळी 11:30 वाजता कारवाई सुरू झाली आणि 45 तासांनंतरही सुरूच आहे. हे सर्वेक्षण आणखी काही काळ सुरू राहणार असल्याचे अधिकार्‍यांने सांगितले. अधिकार्‍यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमतीतील गैरव्यवहारांशी संबंधित मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. या कारवाईबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नसले तरी बीबीसीने म्हटले आहे की ते अधिकार्‍यांना सहकार्य करत आहेत. 

COMMENTS