निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला  कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार  :  डॉ. श्रीपाल सबनीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार : डॉ. श्रीपाल सबनीस

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्मृती चिरंतनपणे जपण्यासाठी केलेली प्रामाणिक धडपड म्हणजे कॉ.गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार होय,आ

राहुरी जिजाऊंच्या लेकींच्या जल्लोषाने दणाणली
पोलीस ठाण्यात विष पिऊन युवकाची आत्महत्या…
शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची महावितरणकडून होळी

अहमदनगर (प्रतिनिधी) :- कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्मृती चिरंतनपणे जपण्यासाठी केलेली प्रामाणिक धडपड म्हणजे कॉ.गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार होय,आणि तो त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिला जातो,ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डाव्या चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते श्रीधर आदिक  यांना डॉ.सबनीस यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते,जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनुर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास भारतीय महिला फेडरेशन च्या प्रदेशाध्यक्ष प्रा.स्मिता पानसरे,भाकपचे राज्य सह सचिव ऍड सुभाष लांडे पा,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत,सौ. ललिता सबनीस व  सौ.वछलाबाई आदिक आदि विचारपिठावर उपस्थित होते.
 यावेळी बोलताना डॉ. सबनीस पुढे म्हणाले कि, श्रीधर आदिक यांचा शेतकरी, कष्टकरी,कामगारांच्या लढ्यात गेली पन्नास वर्षे सक्रिय सहभाग होता,कष्टक-र्यांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्च केले आणि आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली,हाडाचा कार्यकर्त्या कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीधर आदिक होय,त्याची इच्छा शक्ती,त्यांचा आशावाद आणि त्यांची पक्षनिष्ठा वाखाणण्या सारखी आहे,शब्दगंध ची बांधिलकी सामान्य माणसांच्या वेदनेशी जोडलेली आहे, वेदनामुक्तीचे शब्द अस्वस्थ करणार साहित्य जपण्याच काम शब्दगंध गेली वीसवर्षे अव्याहतपणे करत आहे,त्यांच्या कार्याला सलाम.
पुरस्काराला उत्तर देतांना  कॉ.श्रीधर आदिक म्हणाले कि, लहानपणा पासूनच माझ्यावर पुरोगामी विचारांचा संस्कार झाला,त्यामुळे मी सर्वसामान्यासाठी काम करू शकलो, अलीकडच्या काळात सामाजिक सुधारणा कडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्रा.स्मिता पानसरे म्हणाल्या समाजव्यवस्था बदलण्यासाठी सतत संघर्ष करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन संघर्ष अधिक टोकदार होण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनाही जोडून घ्यावे लागते,त्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे, म्हणूनच दरवर्षी शब्दगंध च्या वतीने प्रबोधन पुरस्कार सुरू केला,ही चळवळीला गती देणारी गोष्ट आहे.
यावेळी कॉ.सुभाष लांडे,चंद्रकांत पालवे यांनी मनोगत व्यक्त केले, सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले, प्रा.शर्मिला गोसावी  यांनी सूत्रसंचालन केले,भगवान राऊत यांनी आभार मानले, अभिनव खान्देश साप्ताहिक च्या वतीने देण्यात येणारा गेल्या वर्षीचा  प्रेरणादायी महिला पुरस्कार स्वाती राजेभोसले गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास माजी नगरसेवक अशोक कानडे,ऍड सुभाष भोर,कॉ.बाबा आरगडे,कॉ.बंशी सातपुते,प्रा.सुभाष कडलक,ऍड भूषण ब-हाटे,प्रा.मधुसूदन मुळें, प्राचार्य जी.पी. ढाकणे,कॉ.पांडुरंग शिंदे,शब्बीर शेख,डॉ. बापू चंदनशिवे,ऍड सीताराम तांबे,आर्कि. अर्षदभाई शेख,युन्नूसभाई तांबटकर,कॉ.भगवान गायकवाड,ज्ञानदेव पांडुळे,अशोक सबन,कॉ बहिरनाथ वाकळे, आप्पासाहेब वाबळे, रामदास वाघसकर, नवनाथ वाव्हळ, बेबीनंदा शिंदे यांचे सह प्रगतिशील लेखक संघ, कामगार संघटनांचे प्रतिनिधी इ मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. अशोक कानडे,बबनराव गिरी,अजयकुमार पवार,किशोर डोंगरे,शर्मिला रणधीर,ऋता ठाकूर,भानुदास वाघमारे,अमोल आदिक,विनायक पवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS