Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

उन्हाळ्याच्या दिवसात अशी घ्या त्वचेची काळजी

 उन्हाळा म्हटलं की उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा आल्याच. पण, केवळ ऋतुमानातील बदल म्हणून जर याकडे पाहात असाल तर तुम्ही काहीतरी चुक करता आहात. का

रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज
थोरात यांच्या पाठपुराव्यातून मेंगाळ कुटुंबीयांना 10 लाखाची मदत
लिंबागणेश बसस्थानकावर स्कारपियो आणि बोलेरो मध्ये विचित्र अपघात LokNews24

 उन्हाळा म्हटलं की उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा आल्याच. पण, केवळ ऋतुमानातील बदल म्हणून जर याकडे पाहात असाल तर तुम्ही काहीतरी चुक करता आहात. कारण, दिवसेंदिवस उन्हाळा अधिकच वाढतो आहे. प्रतिवर्षी उन्हाळा त्याच हंगामात येत असला तरी तापमानाचे प्रमाण अधिक वाढते आहे. ज्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. उष्माघात, चक्रर येणे, त्वचेला अॅलर्जी होणे यासारखे प्रकार टाळायचे असतील तर वेळीच पावले उचलणे महत्त्वाचे. अनेक ठिकाणी उन्हाळ्याचा त्रास सहन न झाल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले आहे त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची कळजी नेमकी कशी घ्यावी, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही माहिती फायदेशीर ठरु शकते.

खूप पाणी प्या – उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे कारण ते शरीराला हायड्रेट ठेवते. ज्याचा निर्जलीकरण टाळण्यास फायदा होतो. त्यासाठी दिवसातून किमान तिन ते चार लिटर पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रीत राहण्यास मदत होईल.

सनस्क्रीन वापरा – सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडणार असाल तर टोपी आणि सनग्लासेस घातल्याने सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होते. तसेच, सनक्रीन वापरल्याे त्वचेचे संरक्षण होते.


जास्त काळ घराबाहेर राहणे टाळा
– कडक उन्हातील सूर्यकिरणांबासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा. शक्य तितके सावलीत राहा. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी घराबाहेर पडा. त्याच वेळा आपली कामे आटोपण्यास प्राधान्य द्या.


सैल फिटिंग आणि हलक्या रंगाचे कपडे घाला
– वजनाने हलके आणि कापूस किंवा ताग यांसारख्या नैसर्गिक स्त्रोतांपासून बनवलेले कपडे वापरा. हे फॅब्रिक्स शरीराला श्वास घेण्यास आणि घाम शोषण्यास बरे असतात. ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. सैल कपडे घालणे देखील महत्त्वाचे आहे कारण यामुळे हवा शरीराभोवती फिरते आणि शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

लका आणि सकस आहार घ्या – उन्हाळ्यात हलके आणि सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे. जड जेवण खाल्ल्याने शरीर सुस्त होऊ शकते आणि डिहायड्रेशन होऊ शकते. आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे कारण ते जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

COMMENTS