Homeमहाराष्ट्रबीड

तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पुढाकाराने केज-टाकळी शिव रस्ता मोकळा

शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरणकेज । प्रतिनिधीग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते व शिव रस्ते मोकळे करण्याची मोहिम केज ताल

बीड शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भगवान सोनवणे यांच्याकडे
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
जिल्हा शल्यचिकित्सकांप्रमाणे केज पोलिसांवर कारवाई कधी? उल्हास गिराम यांचा सवाल; बीडमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण
केज । प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते व शिव रस्ते मोकळे करण्याची मोहिम केज तालुक्यात प्रभावीपणे राबवली जात असून, तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पुढाकाराने केज-टाकळी शिव रस्ता सोमवार, दि. 29 डिसेंबर 2025 रोजी मोकळा करण्यात आल्याने परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या ये-जा व शेतीसाठी पाणंद व शिव रस्ते मोकळे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयानुसार केज तालुक्यात कार्यवाही सुरू आहे. केज-टाकळी हा शिव रस्ता राज्यमार्गापासून दक्षिण-उत्तर दिशेने जात असून, सर्वे नं. 107, 108 तसेच केज शिवारातील सर्वे नं. 48 मधून पुढे चिंचोलीमाळी व नांदूर घाट रोडला जोडतो. मात्र गेल्या सुमारे 50 वर्षांपासून काही शेतकर्‍यांनी अतिक्रमण केल्याने हा रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची अवजारे व वाहने ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकर्‍यांनी शासन निर्णय दाखवून तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याकडे शिव रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केल्यानंतर तहसीलदार गिड्डे यांनी महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी भालेराव व तलाठी इनामदार यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला. यावेळी टाकळीचे सरपंच अनंत घुले, ग्रामपंचायत सदस्य सुरेश घुले, शेतकरी रमाकांत बापू मुंडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शिव रस्ता मोकळा झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कार्याबद्दल परिसरातील शेतकर्‍यांनी आभार व्यक्त केले आहेत.

COMMENTS