Homeताज्या बातम्या

श्रीराम मंदिर देणगी प्रकरणी एसआयटीची पुनर्रचना करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार आणि आर्थिक अनियमिततेसंदर्भातील याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्

नीट, राम मंदिर देणगी प्रकरणावरून संसदेत गोंधळ
अखेर उद्धवजींना रामाची आठवण झाली : मुख्यमंत्री फडणवीस
राम मंदिर देणगी प्रकरणी तात्काळ सुनावणी सर्वोच्च नकार
राम मंदिर देणगी घोटाळा, सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश SIT ला स्टेटस  रिपोर्ट देण्याचे निर्देश | Saamana (सामना)


नवी दिल्ली : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार आणि आर्थिक अनियमिततेसंदर्भातील याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची पुनर्रचना करण्याबाबत विचार करावा, असे निर्देश दिले.
सरन्यायाधीश सूर्यकांत तसेच न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्य सरकारतर्फे अहवाल सादर करण्यात आला. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तपास सुरू असून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तपास अद्याप सुरू असल्याने अधिक तपशील सध्या उघड करणे उचित ठरणार नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तपासाची सध्याची रचना जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने विशेष तपास पथकाचे नेतृत्व अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडे सोपविण्याचा विचार करण्याची सूचना केली. या संदर्भात आवश्यक निर्णय घेऊन पुढील सुनावणीवेळी माहिती सादर करण्याचे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला देण्यात आले. तपासावर कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रभाव पडू नये आणि वस्तुनिष्ठ निष्कर्षापर्यंत तो पोहोचावा, अशी अपेक्षाही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

COMMENTS