Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्याध्यापकांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; विद्यार्थ्यांना ‘एक्झाम पॅड’चे वाटपसामाजिक कार्यकर्ते मुसाखान पठाण व शेख वसीम यांचा आदर्श उपक्रम

बीड येथील मिल्लिया मुलांची प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शेर खान सर यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. पा

17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य एल्गार मोर्चागेवराई तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अलीम सय्यद
बीडमध्ये सामाजिक संस्थांची बैठक संपन्न
मुस्लिम नेते शेख युनूस यांचा राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप; जिल्ह्यातील नेत्यांवर प्रश्नचिन्ह



बीड येथील मिल्लिया मुलांची प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शेर खान सर यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याऐवजी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ‘एक्झाम पॅड’ (परीक्षा पॅड) वाटप करून सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते शेख वसीम यांनी केले होते. कार्यक्रमात मुसाखान पठाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर पत्रकार पठाण अमरजान यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला. यावेळी शाळेतील शेख इमरान सर, शेख गफार सर, मोमीन अझरुद्दीन सर, शेख मुस्तमिल सर, शेख इकबाल सर, रफत मॅडम, नूजत मॅडम, फौजीया मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवस साजरा करताना समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

COMMENTS