बंदूक लावून पळवून नेऊन लग्न व बलात्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंदूक लावून पळवून नेऊन लग्न व बलात्कार

नेवाशात गुन्हा दाखल, अल्पवयीन असल्यापासून पाठलाग

अहमदनगर/प्रतिनिधी : पंधरा वर्षांची असताना विद्यार्थिनीची छेडछाड करून तिला बंदूक लावून पळवून नेवून लग्न करून 5 लाख मागत अत्याचार करून धमकी दिली. याप्र

LOK News 24 ।सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी : पंधरा वर्षांची असताना विद्यार्थिनीची छेडछाड करून तिला बंदूक लावून पळवून नेवून लग्न करून 5 लाख मागत अत्याचार करून धमकी दिली. याप्रकरणी पीडित नेवासा तालुक्यातील तरुणीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून पोलिसांनी अमोल गंगाधर शिंदे याच्यासह अन्य काहींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा 2015 पासून अमोल याने वेळोवेळी पाठलाग करून छेड काढत त्रास दिला. ही विद्यार्थिनी 17 वर्षाची असताना अमोल व त्याच्या नातेवाईकांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली, तेव्हा वडीलांनी अमोल व त्याच्या नातेवाईकांना नाही सांगितले. त्यानंतर बळजबरीने त्यांनी गाडी (क्रमांक एमएच 17 ए झेड-8527) हिच्यात तिला टाकून घरी घेवून गेले. इतर आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली व अमोल याच्याबरोबर पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचे काढलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बळजबरीने त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर अमोल याने मुलगी अल्पवयीन पीडित मुलीचे वडील म्हणजे सासर्‍याकडे लग्न करणार नाही, असा स्पष्ट सांगून 5 लाख रुपये आण असे म्हणत लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी पैशाची मागणी करून घरात कोंडून ठेवून या अल्पवयीन मुलीस शारीरिक व तिच्या वडीलांना बंदुकीचा धाक दाखवून मानसिक छळ करून अत्याचार केला. याप्रकरणी भरोसा सेल नगर येथे तक्रार आल्यानंतर याप्रकरणी पीडित 22 वर्षांच्या विवाहीत तरुणीने नेवासा पोलिसात फिर्याद दिल्यावरून अमोल गंगाधर शिंदे (पती), गंगाधर रामकृष्ण शिंदे(सासरा), कुसूम गंगाधर शिंदे(सासू), भूषण गंगाधर शिंदे(भाया), राणी भूषण शिंदे(जाव), बाळासाहेब रामकृष्ण शिंदे (चुलत सासरा), बाळासाहेब याची पत्नी (चुलत सासू), राहुल बाळासाहेब शिंदे, उषा राहुल शिंदे (रा. नेवासा), भारती महेश गोंदकर (रा. शिर्डी), पूजा नितीन गुळवे (रा. देवगड, ता. नेवासा), रुपाली निशाल मरगळ (रा. नेवासा बु.) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 376 (2) (आय) (जे), 354 (अ,) 366 (अ,) 363, 498( अ,) 323, 504, 506, 34, बालकांचे लैगिक अत्यारापासून संरक्षण पोक्सो कायदा कलम 4, 6, 7, 12, 17, आर्म अ‍ॅक्ट 3/25, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उप निरीक्षक भटेवाल पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS