Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातून 15 हजार शिवसैनिक मुंबईला जाणार

सातारा / प्रतिनिधी : शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मोठ्या जल्लोशात होणार आहे. त्यासाठी सुमारे 600 वाहनांद्वारे बीकेसीच्या मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्

पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?
लोणीतील गौरी सजावट बक्षीण वितरण उत्साहात
कोपरगावात ब्लॅक बेल्ट कराटे कॅम्प परीक्षा उत्साहात

सातारा / प्रतिनिधी : शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मोठ्या जल्लोशात होणार आहे. त्यासाठी सुमारे 600 वाहनांद्वारे बीकेसीच्या मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्यास 15 हजार शिवसैनिक जाणार आहे. या मेळाव्याची जय्यद तयारी करण्यात आली असून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक दसरा मेळाव्यास जाणार असल्याची माहिती सातारचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेने सुरु केलेला दसरा मेळावा यंदा वेगळ्याच ढंगाने होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील यंदा पहिल्यांदाच 15 हजार शिवसैनिक जाणार आहेत. त्यासाठी खाजगी गाड्यांसह लक्झरी गाड्या व एसटी महामंडळाच्या सुमारे 600 गाड्यांच्या द्वारे ये-जा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास वेगवेगळ्या पध्दतीने आघाड्यांनी नियोजन केल्याचे ना. देसाई यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS