Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  दया कूछ तो गडबड है  

गजानन काळे यांची विरोधी पक्ष नेते अजित पवारांवर टीका

मुंबई प्रतिनिधी  -  महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न उभे आहेत मात्र महाराष्ट्रातील शॉडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटले जाते ते विरोधी पक्ष नेते अजित  पवार का

‘यूपी’त भाजपला हादरे ; तिसर्‍या कॅबीनेट मंत्र्याचा राजीनामा
नामको निवडणुकीत प्रगती पॅनलमध्ये सकल सोनार समाजाचा केवळ मतदाना साठी उपयोग…. 
दत्तक उद्याने पुन्हा निराधार

मुंबई प्रतिनिधी  –  महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न उभे आहेत मात्र महाराष्ट्रातील शॉडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटले जाते ते विरोधी पक्ष नेते अजित  पवार काही दिवसापासून शांत असल्याचे आपण बघितले.इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात तब्येत बरी नसताना शरद पवार उपस्थिती लावतात. मात्र काही वयक्तिक कारण सांगून अजित पवार हे अनुपस्थित होते.दया कूछ तो गडबड हैं  एवढे मात्र नक्की.काल परवा अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळे यांच्यावर इतक्या गलीच्छ भाषेत,शिवराळ भाषेत बोलतो. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या ट्विटर अकाउंट वर सुध्दा याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या मीडियाला सुध्दा अजित पवार  यांनी निषेध नोंदवला आहे हे दिसत नाही.अशी प्रतिक्रया गजानन काळे यांनी दिली

COMMENTS