Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मळगंगा देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ;शेकडो महिलांची उपस्थिती;  भक्तिमय वातावरणात जल्लोष

निघोज : राज्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी (दि. १ एप्रिल) उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी पाच

अपघातात मृत्यू; नगर-कल्याण महामार्गावर तीन तास रास्तारोको
स्व. अजितदादांनीच नीलेश लंकेंना संधी दिली
रामनवमी निमित्त निघोज येथे रक्तदान शिबीर उत्साहात

निघोज : राज्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी (दि. १ एप्रिल) उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी पाच ते सायंकाळी सहा या वेळेत हळदी कार्यक्रमासाठी शेकडो महिलांनी मळगंगा मंदिरात मोठी गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यात्रोत्सवाच्या प्रारंभी मंदिरापासून देवीच्या हेमाडपंथी बारवपर्यंत हळदीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘मळगंगा देवीच्या जयजयकारा’ने परिसर दणाणून गेला होता. वाजतगाजत निघालेल्या या मिरवणुकीत महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यानंतर मंदिरात देवीला हळद लावून भक्तीभाव व्यक्त करण्यात आला. देवीगीते आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

दरम्यान, गुरुवारी (दि. २ एप्रिल) सायंकाळी पाच ते सात या वेळेत ८५ फूट उंच काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. हेमाडपंथी बारव ते मंदिर असा हा प्रवास भक्तांच्या श्रमांतून पार पडत असून, देवीच्या कृपेने ही मिरवणूक अवघ्या दोन तासांत पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काठी उभारल्यानंतर घागर मिरवणूक तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) यात्रेला प्रारंभ होणार आहे.

यात्रा कालावधीत दहा दिवस पशूहत्या बंद ठेवली जाते. या काळात देवीला नैवेद्य म्हणून घरोघरी पुरणपोळी अर्पण केली जाते. तसेच सवाष्णींना बोलावून महाप्रसाद दिला जातो. यात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात धार्मिक व पारंपरिक वातावरण निर्माण झाले आहे.

देवीच्या कृपेने जिल्ह्यात सुख-समृद्धी’

मळगंगा देवीला हळद लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी उपस्थिती लावली. त्या अनेक वर्षांपासून या उत्सवात सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी मळगंगा देवी हे नवसाला पावणारे जागृत देवस्थान असल्याचे सांगत, देवीच्या आशीर्वादाने अहिल्यानगर जिल्ह्यात सुख, समृद्धी व शांतता नांदत असल्याची भावना व्यक्त केली.

COMMENTS