Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामनवमी निमित्त निघोज येथे रक्तदान शिबीर उत्साहात

निघोज : रामनवमीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत साधना सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “रक्तदान ह

‘ठोळे’ विद्यालयात रहिवासी प्रमाणपत्र वितरण सोहळा
Ahmednagar : पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल | LOKNews24
कोपरगाव बाजार समितीच्या कार्यक्रमावर उपसभापती-संचालकांचा बहिष्कार; कार्यक्रमाचा निषेध

निघोज : रामनवमीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत साधना सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश कृतीतून देत या उपक्रमाने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

सदर शिबीर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडले. पुणे येथील सिरिओलॉजी ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात अनुभवी वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले. शिबिरासाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.

पंचायत क्षेत्रातील युवक, शेतकरी, कामगार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली. अनेकांनी प्रथमच रक्तदान करत सामाजिक जबाबदारी पार पाडली.

या उपक्रमाचे आयोजन कृषी अधिकारी व योगशिक्षक संदीप गायकवाड, सोमनाथ ढवळे, नवनाथ घुले, योगेश कवाद तसेच इतर सिद्ध समाधी साधकांनी नियोजनबद्ध पद्धतीने केले. स्वयंसेवकांनी शिबिरादरम्यान रक्तदात्यांचे मार्गदर्शन करत त्यांच्या सोयीची विशेष काळजी घेतली.

COMMENTS