Homeताज्या बातम्या

सिडको परिसरातील मातृ सेवा आरोग्य केंद्रात पुर्ण वेळ महिला व पुरुष डॉक्टर सह प्रसुती गृह व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करा – संजय घोगरे

नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या आयोजित सर्वसाधारण सभेत सिडको परिसरातील मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे पुर्ण वेळ महिला व पुरुष डॉक्टर स

ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा नाही; सहा खासदारांच्या विलिनीकरणावर स्थगती देण्यास नकार
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील मृत्यूंची उच्च न्यायालयाकडून दखल
मानवजिगरा सोन्नर यांचे तब्ब्ल 100 वेळा रक्तदान; डॉ. अंजली बांगर यांनी केला सत्कार
NANDED WAGHALA CITY MUNICIPAL CORPORATION, NANDED

नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या आयोजित सर्वसाधारण सभेत सिडको परिसरातील मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे पुर्ण वेळ महिला व पुरुष डॉक्टर सह प्रसुती गृह व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करून सर्व सामान्य जनतेला दिलासा देऊन हडको परिसरातील लहुजी नगर भागातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्ता तात्काळ मुख्य रस्त्यास जोडुन येथील नागरिकांना जाण्यासाठी व येणार्‍या साठी मोकळा करून द्यावा अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संजय पाटील घोगरे यांनी केली असून अशी मागणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नावामनपाची सर्वसाधारण सभा 11 ऑगस्ट रोजी मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत, आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,निलेश सुंकेवार यांच्या सह विविध विभागांचे सहायक आयुक्त,विभाग प्रमुख व नगरसेवक यांच्यी उपस्थिती होती. यावेळी सिडको येथील मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे गेल्या काही वर्षांपुर्वी प्रसुती गृह व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सह पुर्ण वेळ महिला व पुरुष डॉक्टर कार्यान्वित होते ते बंद करून नांदेड येथे हालविणयात आल्यामुळे महिला रूग्णांना सह सामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसत असल्याने पुन्हा या ठिकाणी चालु करून दिलासा द्यावा. यासह नांदेड उस्मान नगर कंधार मुख्य मार्गावर असलेल्या मनपा हद्दीतील मनपा प्रभाग क्रमांक 20 मधील लहुजी नगर भागातील मुख्य रस्ता बाबत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत लहुजी नगर हडको भागातील मुख्य मार्गा लगत असलेल्या वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास शेकडो कुटुंबे या परिसरात वास्तव्यास असून राज्य शासनाच्यी अश्राम शाळा या परिसरात असुन भुखंड धारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता भिंत बांधून बंद केला असल्याने या रस्त्यावर असलेले संबंधित भुखंड धारकांना मावेजा देऊन हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली होती,या मागणी संदर्भात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कडे लक्ष वेधले होते परंतु अद्यापही मनपा प्रशासनाने या बाबत काहीच कार्यवाही न केल्याने परिसरातील नागरिक व संबंधित शाळेचे शिक्षक विद्यार्थी आपली सायकल,दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर लावुन सुमारे एक किलो मिटर पायी जात आहेत तर पावसाळ्यात नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे संबंधित भुखंड धारकांना मावेजा अथवा अतिक्रमण काढून तात्काळ रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली असून या मागणी संदर्भात प्रशासनाने नोंद घेतली आहे. या मागणीला सभागृहातील सदस्यांनी पाठिंबा दर्शविला असून लवकरच प्रशासनाकडून कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS