देगलूर - गेल्या अनेक वर्षांपासून देगलूर शहर व तालुक्याचा अपेक्षित विकास रखडला आहे. तसेच रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे युवकांमध्ये बेरोजगारीचा प्

देगलूर – गेल्या अनेक वर्षांपासून देगलूर शहर व तालुक्याचा अपेक्षित विकास रखडला आहे. तसेच रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे युवकांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तथा आर्यभानू सेवाभावी संस्थेच्या संस्थाचालक वर्षा भुताळे यांनी थेट मंत्रालयात जाऊन निवेदन सादर केले आहे. देगलूरच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, वाहतूक, रोजगार, कायदा-सुव्यवस्था यांसह विविध ११ मागण्यांचे निवेदन संबंधित विभागांकडे सादर करण्यात आले आहे. अत्याधुनिक हृदयरुग्णालय व आयसीयू, नियमित शुद्ध पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, सुरळीत वीजपुरवठा आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांसोबत युवकांसाठी रोजगारनिर्मिती करणारे उद्योग उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मटका, जुगार, गांजा, हातभट्टी दारू यांसह अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. महिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच देगलूर शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS