Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’; जलसंधारण सप्ताहाच्या आयोजनाचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

नांदेड - मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिन 21 ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्

रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
किनवटचा ’कोंडवाडा’ आणि प्रशासनाचे ’बधिर’ मौन! मोकाट गाढवे व खेचरांमुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा
आ. केराम यांचे नीलकंठ कातले व प्रकाश कुडमते हेच अधिकृत स्वीय सहाय्यक; अनधिकृत दाव्यांमुळे होणारा संभ्रम टाळण्याचे आवाहन
नांदेड में 21 अगस्त को 'महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर', कलेक्टर राहुल कर्ड़िले  की अध्यक्षता में समीक्षा बैठक नांदेड, 11 अगस्त: मिट्टी और जल संरक्षण ...

नांदेड – मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिन 21 ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्यात 15 ते 21 ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत जनजागृती करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने 21 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह प्रभावीपणे राबवावा, तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक नियोजन करून परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.

COMMENTS