Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा ः मंत्री गिरीश महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील 15  दिवसापासून शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्य

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन : मंत्री प्रकाश आबिटकर
धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी
प.बंगाल, तामिळनाडूत आज मतदानईव्हीएमशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील 15  दिवसापासून शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव तालुक्यातील वडली येथे कृषी केंद्रास भेट देऊन सदरील रासायनिक खतांची विक्री  बंदची नोटीस देऊन खताचे नमुने संकलित करण्याचे आदेश दिले व शेतकर्‍यांसमवेत चर्चा केली.
पाचोरा तालुक्यातील कुर्‍हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकर्‍यांची फसवणूक करताना  आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून अहवाल 24 तासात दाखल करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. शेतकर्‍यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची पोस्ट राज्य शासनाने गांभीर्याने घेतली असून या अनुषंगाने 16 जुलैच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकर्‍यांचे होणार्‍या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित झाला.

COMMENTS