Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगडमध्ये पोलिसांची मद्यवाहतुकीवर मोठी कारवाई,१४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,दोघेजण ताब्यात

https://www.youtube.com/watch?v=U9Q8SVb_J-8 कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेकायदेशीर गोवा बन

मीरा रोडमध्ये ईदीच्या बकऱ्यांमध्ये डुक्कर सोडल्याने तणाव; पोलिसांचे शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंना बदनाम करणारा अ.अभियंता सिद्धार्थ तांबे । लोकमंथन | Lokmanthan News24
मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; टिटवाळ्यात ६ कोटींच्या अमली गोळ्या जप्त, डान्सबारमधील तरुणीला बेड्या

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. तिलारी ते चंदगड मार्गावरील पार्ले (ता. चंदगड) गावच्या हद्दीत.
शुक्रवार (दि. १ मे २०२६) सायंकाळी ४ च्या सुमारास एकूण १४ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. यामध्ये विविध कंपन्यांच्या ४,२७२ दारूच्या बाटल्या (किंमत सुमारे ९ लाख २४ हजार रुपये), वाहतुकीसाठी वापरलेले ५ लाखांचे वाहन आणि मोबाईल फोनचा समावेश आहे. ही कारवाई गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या कोल्हापूर व परिसरात पोहोचवण्याच्या प्रयत्नात असताना करण्यात आली. या घटनेमुळे सीमाभागातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS