Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात कोयत्याने वार करून तरूणाची हत्या

मुळशी पॅटर्न स्टाईलने पाठलाग करून कोयत्याचे वार

पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढताच दिसून येत आहे. कोयता गँगची दहशत अजूनही संपलेली नसून, रविवारी मध्यरात्

आईनेच केली २० दिवसांच्या चिमुकलीची हत्या
पोटच्या मुलानेच घोटला वडीलांचा गळा !
धारदार शस्त्राने प्रेयसीची हत्या

पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये गुन्हेगारीचा आलेख सातत्याने चढताच दिसून येत आहे. कोयता गँगची दहशत अजूनही संपलेली नसून, रविवारी मध्यरात्री या कोयता गँगेने रविवारी मध्यरात्री पुण्याच्या गणेश पेठेत एका तरूणाची कोयत्याने वार करून हत्या केली. तरुणाचा पाठलाग करून मुळशी पॅटर्न स्टाइलने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पुढे आले आहे. हा प्रकार फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करून त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले. सिद्धार्थचे काही जणांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. या वादातून काही जणांनी त्याचा कोयते घेऊन पाठलाग केला. जीव वाचवण्याच्या भीतीने सिद्धार्थ हा पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला. मात्र, आरोपींनी त्याला त्या ठिकाणी गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात सिद्धार्थ हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

COMMENTS