Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी बांधला लाकडी सेतू; मोरणा विभागातील गोकुळ धावडे विद्यालयातील शिक्षकांची अनोखी शक्कल

पाटण / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ तसेच पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका
कराड तालुक्यातील वराडे येथील अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्रासाठी साडेसात कोटी
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद

पाटण / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ तसेच पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ते, छोटे-मोठे पूल वाहून जाण्याच्या घटना घडत असतात. यामुळे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. या परस्थीतीवर मोरणा विभागातील गोकुळ धावडे विद्यालयाच्या शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवून मात केली. मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी ओढ्यावर चक्क लाकडी पुल उभारला आहे.
पाटण तालुक्यातील मोरणा खोरे म्हटले की, पावसाचे माहेरघर, अशा दुर्गम डोंगराळी भागात गुरेघर धरणाच्या पायथ्याशी असलेले मोरणा शिक्षण संस्थेचे गोकूळ-धावडे हे माध्यमिक विदयालय असून इ.5 वी ते इ. 10 वी पर्यंतचे वर्ग असून साधारणपणे 300 दरम्यान विद्यार्थी या विद्यालयात शिकत आहेत. परिसरातील काहीर, आंबेघर, बाहे, दिक्षी, गोकूळ, धावडे, कोरडेवाडी, वरंडेवाडी, शिद्रुकवाडी, आंब्रग, वरंडेवाडी, वर्पेवाडी या गावांतील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. परंतू गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात सतत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे या विद्यालयातील सर्व शिक्षकांनी शक्कल शोधून काढली. आंब्रग येथील ओढ्यावर असलेला जुन्या काळातील पूल वाहून गेला होता. तो आता पावसाळ्यात बांधणे बांधकाम विभागाला अशक्य होते. परंतू मुख्याध्यापक पी. एल. केंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक एस. डी. शेजवळ, एन. एस. कुंभार, टी. व्ही. शिंदे, व्ही. एच. लोहार, आर. आर. मोरे, व्ही. ए. घोणे, डी. बी. माने, बाजीराव यादव, राहूल भिसे यांनी एकत्रित येवून गावातील सुतार कारागिराच्या मदतीने लाकडी पूल दोन दिवसांत बांधला. त्यामुळे आंब्रग तसेच आजूबाजूच्या वस्तीतील मुला-मुलींना ऐन पावसाळ्यात शाळेत ये-जा करता येवू लागली आहे. त्यामुळे मुलांच्या तसेच ग्रामस्थाच्या चेहर्‍यावर हसू उमटले. दरम्यान, शिक्षकांच्या या अनोख्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS