Homeताज्या बातम्या

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ३ लाखांच्या ५ चोरीच्या दुचाकी जप्त; मुदखेडचा आरोपी गजाआड

नांदेड : जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात असलेल्या ’

देगलूर-बिलोली मतदारसंघात जनतेचा संताप अनावर! वाळू माफिया, वाढती गुंडगिरी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात
पत्त्याच्या डावावरील पैशांच्या उधारीतून खून; हदगाव तालुक्यातील निवघा गावात तरुणाची हत्या, मित्र गंभीर जखमी
पावर कंपनीच्या कथित अतिक्रमणाविरोधात वृद्ध शेतकरी व मुलीचा आत्मदहनाचा इशारा

नांदेड : जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात असलेल्या ’ऑपरेशन फ्लश आऊट’ (Operation Flush Out) अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. विष्णुपूर येथील सरकारी दवाखान्याच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करताना पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ३ लाख रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. लखन शिवाजी हातागळे (वय २१ वर्ष, रा. नवीन आबादी, मुदखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सरकारी दवाखान्यातील चोरीचा तपास करताना फुटले बिंग: धनेगाव (ता. जि. नांदेड) येथील रहिवासी शिवाजी राजाराम निलपत्रेवार यांची मोटारसायकल ३१ मे २०२६ रोजी विष्णुपूर येथील सरकारी दवाखान्याच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे यांच्या पथकाने अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुदखेड येथील लखन हातागळे याला ताब्यात घेतले.

घरातून काढून दिल्या ५ मोटारसायकली: पोलिसांनी आरोपी लखन हातागळे याची कसून चौकशी केली असता, त्याने विष्णुपूर सरकारी दवाखान्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याने नांदेडसह शेजारील जिल्ह्यातूनही दुचाकी चोरल्याचे उघड केले. आरोपीने कामठा (ता. अर्धापूर), लहान लोणी (ता. अर्धापूर), सोनपेठ (जि. परभणी) आणि जवळा बाजार (जि. हिंगोली) या चार वेगवेगळ्या ठिकाणांवरून दुचाकी चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून एकूण ३ लाख रुपये किमतीच्या ५ हिरो होंडा (स्प्लेंडर आणि सीडी डिलक्स) कंपनीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपीला या गुन्ह्यात रीतसर अटक करण्यात आली असून, पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक: सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे (इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नांदेड ग्रामीणचे पो.नि. ओमकांत चिंचोलकर, पो.उ.नि. व्यंकट कुसमे आणि पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, मारोती पचलिंग, सचिन चावरे, समीर अहमद, धम्मपाल कांबळे, शंकर माळगे, सुरेश नागरगोजे आणि शिवानंद तेजबंद यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.

COMMENTS