Homeताज्या बातम्या

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेचा धडाका

दुसऱ्याच दिवशी १३.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेने वेग

कर्जतमध्ये हॉटेलमधील आचाऱ्याचा निर्घृण खून; उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना दौंड रेल्वेस्थानकावरून घेतले ताब्यात
डॉ. मनुरकरांना बीजिंग विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी; शेवगावच्या ग्रामीण युवकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी
ओबीसी आरक्षणाला हात लावल्यास रस्त्यावर उतरू; डॉ. बबनराव तायवाडे यांचा इशारा

दुसऱ्याच दिवशी १३.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेने वेग घेतला असून, दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ लाख ८४ हजार ७२१ रुपयांचा गुटखा व अन्य साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० जूनदरम्यान परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व अधीनस्थ अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दुसऱ्या दिवशी गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक कारवाई करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात एक, हिंगोली जिल्ह्यात एक तर लातूर जिल्ह्यात दोन अशा एकूण चार कारवाया करण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

सध्या परिक्षेत्रात गुटखा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी, पानमसाला, खर्रा, मावा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अशा पदार्थांची साठवणूक, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अन्वये कारवाई केली जात आहे. संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून दोषींना कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून परिक्षेत्रातील पानटपऱ्यांचीही व्यापक तपासणी सुरू आहे. आतापर्यंत २६४ पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून गुटखा व अमली पदार्थांच्या संभाव्य साठवणुकीच्या ठिकाणांवर विशेष नजर ठेवली जात आहे. दरम्यान, अवैध धंद्यांविषयी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील गुटखा विक्री, अमली पदार्थांचा व्यवहार किंवा अन्य अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

COMMENTS