पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी - नगर जिल्ह्यात एमएच-01 या स्कार्पिओ वाहनातून काहीजण मुंबई पोलिस असल्याचे भासवून पैशाची मागणी करून व दारू बॉक्स हॉटेलमधून घेऊन जात

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचा समारोप
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्याय
आमदार आशुतोष काळे यांचा व्यापारी संघाकडून नागरी सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी – नगर जिल्ह्यात एमएच-01 या स्कार्पिओ वाहनातून काहीजण मुंबई पोलिस असल्याचे भासवून पैशाची मागणी करून व दारू बॉक्स हॉटेलमधून घेऊन जात असल्याची माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.
राहुरी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाठविलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, एम एच-01 पांढर्‍या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीमधून 4 ते 5 जण मुंबई पोलिस असल्याची बतावणी करून हॉटेल चेक करीत आहेत व हॉटेल चालकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन 5 ते 10 हजार रुपयांची मागणी करीत आहेत तसेच अधिकृत परमिट रूममधील दारूचे बॉक्स व पैसे घेऊन जात आहेत. हॉटेलमध्ये जाण्याअगोदर गाडीवर पोलिस स्टीकर व लाल दिवा लावतात. त्यामुळे हद्दीमधील सर्व हॉटेलचालकांना याबाबत सूचना देऊन या व्यक्ती मिळून आल्यास 8208136199 किंवा 02426-232433 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS