Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीनगरमधून 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

अहमदाबाद गुन्हे शाखेची कारवाई

छ.संभाजीनगर ः ललित पाटीलच्या ड्रग्स कारनाम्यापाठोपाठ आणखी ड्रग्स कारनामे उघडकीस येत असून गुजरात पोलिसांची अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर

मराठवाड्यावर आभाळ फाटले
जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजी नगर च्या लेणीला भेट
औरंगाबादमधून आणखी तीन मुली बेपत्ता

छ.संभाजीनगर ः ललित पाटीलच्या ड्रग्स कारनाम्यापाठोपाठ आणखी ड्रग्स कारनामे उघडकीस येत असून गुजरात पोलिसांची अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी महाराष्ट्रात संयुक्त कारवाईत करून छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यावर छापा घालून तेथून कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल 500 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ही कारवाई अहमदागाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी केली आहे. या कारवाईत कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे.

या ठिकाणी रसायनांच्या आडून ड्रग्ज तयार केली जात असल्याचे तपासात उघड झाले. सध्या हे ड्रग्ज कुठे आणि कुणाला पुरवली जात होती, याचा तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवणारा कारखाना आढळल्यानंतर देशातील उच्च सुरक्षा यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याची गुप्त माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. यानंतर डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान ही माहिती खरी आढळून आली असून छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची खरी लिंक सापडली आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली. संभाजीनगरमधील या कारखान्यातून 200 कोटी रुपयांच्या तयार ड्रग्जसह 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत या कच्च्या मालापासून 300 कोटी रुपयांची ड्रग्ज तयार करण्याची तयारी होती. मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई पूर्ण झाली आहे. सध्या त्याचे संपूर्ण दुवे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

COMMENTS