Homeताज्या बातम्या

महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजय निश्चित असल्याचा अशोकराव चव्हाण यांचा दावा

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज

नांदेड विधानपरिषद रणसंग्राम : चव्हाणांचे ‘चाणक्य’ राजूरकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर; महायुतीतील छुप्या संघर्षाचीही चर्चा
विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
नांदेड विधान परिषद रणधुमाळी : नाराजांची कुजबुज की पक्षशिस्तीचा बुलडोझर?

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाबाबत कोणतीही शंका नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, “अमरनाथ राजूरकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांना तिन्ही घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे. नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे संख्याबळ पाहता हा विजय निश्चित आहे. आमच्या पाठीशी दृश्य आणि अदृश्य अशा अनेक शक्ती आहेत, त्यामुळे महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्र अर्ज दाखल झाल्याबद्दल विचारले असता, महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा उशिरा झाल्यामुळे काही पदाधिकार्‍यांना अंतिम निर्णयाची माहिती नसावी, म्हणून तो अर्ज दाखल झाला असावा, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत सर्व बाबी स्पष्ट होतील आणि महायुती एकसंघपणे निवडणूक लढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शक्तिप्रदर्शनामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे.

COMMENTS