Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली : डॉ. प्रमोद गायकेसौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी

बीड : दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या

डॉ. बाबासाहेबांचे जीवन आजच्या पिढीस प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागरसौ. के.एस.के. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
केजमध्ये खा.बजरंग सोनवणे यांनी अर्पण केली महामानवाला मानवंदना!
पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  

बीड : दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. प्रमोद गायके यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अठराव्या शतकात ज्योतीराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती घडवली. आज देश जो प्रगतीच्या मार्गावर आहे, त्यामध्ये महात्मा फुले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महात्मा फुले यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे समाज प्रगतीच्या दिशेने पुढे गेला आहे. त्यांनी जातीय निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून त्यांचे साहित्य व विचार आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. महात्मा फुले हे उत्कृष्ट लेखक असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर आधारित समृद्ध ग्रंथसंपदा उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ. ए. एस. खान, कमवीचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंद कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. घोडके यादव, डॉ. इमाद सय्यद, डॉ. पल्लवी इरलापल्ले, प्रा. जयंत साठे तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

COMMENTS