बेमोसमी अवकळा!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेमोसमी अवकळा!

     महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा केवळ हवामानाचा बदल नसून एक गंभीर सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय संकट

पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
आयकर स्लॅब जैसे थे
संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 15 टक्क्यांनी वाढ
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1-1.png

     महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा केवळ हवामानाचा बदल नसून एक गंभीर सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय संकट बनत चालला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, वादळी वारे आणि गारपीट यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा शेतकरी, सामान्य जनजीवन, पर्यावरण आणि आरोग्य यावर होणारा परिणाम सविस्तरपणे पाहणे आवश्यक आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत आहे. राज्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी यांसारखी रब्बी पिके नष्ट होण्याचा धोका यामुळे उद्भवला आहे. आंबा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या फळबागांचे नुकसान कोकण आणि नाशिक पट्ट्यात होण्याचा धोकाही आहेच. कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान आणि काढणीला आलेली पिके भिजून खराब झाली आहेत.‌शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेले पीक निसर्गही अशा रीतीने वाया घालवतो आहे.

नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांत गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर पाचवीला पूजल्यासारखे आहेच. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. कर्जबाजारीपण वाढते आहे. कर्जमाफी होत नाही.

थोडेफार उत्पादन जर मिळालेच तर, बाजारात दर घसरल्याने दुहेरी फटका बसणार! यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला असून तातडीच्या मदतीची नितांत गरज निर्माण झाली आहे.

अचानक होणाऱ्या पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत होत आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे होणे तर नित्याचेच झाले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे तर भानच एम‌एस‌ईबी ला नसते.

बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम ठरलेलाच तर,

शाळा-कॉलेज आणि एकंदरीत नागरी जीवन अस्ताव्यस्त होण्याचे प्रमाण यामुळे वाढत चालले आहे. विशेषतः उन्हाळ्यात अशा पावसामुळे लोकांची दिनचर्या पूर्णपणे बदलते आणि अनिश्चितता वाढते. अवकाळी पाऊस हा हवामानातील असंतुलनाचे लक्षण मानला जातो. हवामानातील बदल, तापमानातील चढउतार आणि आर्द्रतेतील वाढ यामुळे अशा घटना वाढत आहेत. ऋतुचक्रात बदल, पर्जन्यमानाचा अनियमित पॅटर्न मातीची धूप आणि सुपीकता कमी होणे

या सर्व जैव विविधतेवर परिणाम याचा दुष्परिणाम होतो आहे.

तरीही, ही परिस्थिती दीर्घकालीन हवामान बदल अधिक तीव्र होत असल्याचे संकेत देते, असं म्हणणे अनिवार्य आहे.

अवकाळी पावसाचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम मानवी आरोग्यावरही होतो. यातून संभाव्य आरोग्यधोके सर्दी, ताप, व्हायरल संसर्ग वाढणे, दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार

डासांची वाढ, डेंग्यू, मलेरियाचा धोका, मानसिक ताण विशेषतः शेतकरी वर्गात वाढतो. अचानक तापमानातील बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारांचे प्रमाण वाढते. ही परिस्थिती केवळ शेतीपुरती मर्यादित नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेला प्रभावित करते. अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम, महागाई वाढण्याची शक्यता, ग्रामीण अर्थव्यवस्था क

अस्थिर होणे आणि रोजगारावर देखील याचा परिणाम नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने ग्रामीण बाजारपेठांवरही त्याचा परिणाम दिसून येतो.

या संकटावर मात करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आवश्यक आहेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत

पंचनामे आणि विमा दावे जलद करणे, हवामान सूचना प्रणाली मजबूत करणे हे तात्पुरते उपाय करणे शासनाने आवश्यक आहे. तर, दीर्घकालीन बदलासाठी हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती विकसित करण्यासाठी शासन स्तरावर मोहीम आखण्यात यावी. जलसंधारण आणि मृदा संरक्षण यासाठी वारंवार माती तपासणी करणे, जमीनीची धूप होण्यापासून वाचवणे आदी उपायांबरोबरच पीक विमा योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर ही मोठ्या स्तरावर केला जावा.

महाराष्ट्रातील सध्याची गारपीट आणि अवकाळी पावसाची परिस्थिती ही एक गंभीर चेतावणी आहे. हा केवळ नैसर्गिक प्रकार नसून हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत असल्याचे द्योतक आहे. यामुळे शेती, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रांवर व्यापक परिणाम होत आहेत.

जर वेळेत योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात अशा आपत्ती अधिक गंभीर स्वरूपात समोर येऊ शकतात. त्यामुळे शासन, वैज्ञानिक संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करणे अत्यंत आवश्यक आहे.

COMMENTS