रात्रीच्या वेळी वाहन चालकांना लुटणारे दोन आरोपी मुद्देमालासह पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्रीच्या वेळी वाहन चालकांना लुटणारे दोन आरोपी मुद्देमालासह पकडले

नेवासा(प्रतिनिधी) रात्रीच्यावेळी हायवे रोडवरील वाहन चालकांना लुटणाऱ्या दोन जणांना पकडण्यात  नेवासा पोलिसांना यश आले असून मुद्देमालासह त्यांना

राहत्या पालात तलावाचे पाणी शिरलेल्या आदिवासी बांधावांना मदत
सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ
Ahmednagar : डॉ.अमोल बागुल यांना नीती आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान (Video)

नेवासा(प्रतिनिधी)

रात्रीच्यावेळी हायवे रोडवरील वाहन चालकांना लुटणाऱ्या दोन जणांना पकडण्यात  नेवासा पोलिसांना यश आले असून मुद्देमालासह त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की काही महिन्यांपूर्वी अमरावती येथील डॉ.सतीश नामदेव विधळे हे कुटुंब पुणे येथे जात असतांना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम शिवारात असलेल्या हिंदुस्थान धाब्याजवळ गाडी पंचर झाल्याने गाडीचे चाक बदलत असतांना मोटारसायकल वरील दोन इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने त्यांच्याकडील दहा हजाराची रोख रक्कम तीन मोबाइल असे घेऊन पोबारा केला होता याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला१५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता.याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक समाधान भाटेवाल हे करत होते.

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन ठकसेन काळे व राहुल बाळू खिलारे रा.वाळुंज जिल्हा औरंगाबाद यांना ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस  केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तीन मोबाइल एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून या आरोपींकडून रस्ता लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीमध्ये सचिन ठकसेन काळे या आरोपीवर वाळुंज,एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन,गंगापूर,उस्मानपुरा,बदनापूर,सिडको पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते

सदरची कौतुकास्पद कामगिरी ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे,

उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस नाईक बबन तमनर,अशोक कुदळे,पो.कॉ. अंबादास गीते,बाळासाहेब खेडकर,केवलसिंग रजपूत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील

सायबर टीमचे पोलीस नाईक फुरकान शेख,प्रमोद जाधव यांनी केली.

COMMENTS