बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल येथे गुरुवार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण

बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल येथे गुरुवार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या उमा जगतकर यांच्या हस्ते सकाळी 7:45 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. यानंतर राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांनी भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. याप्रसंगी बोलताना प्राचार्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास आणि समाजाच्या जडणघडणीत कामगारांचे असलेले मोलाचे योगदान यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS