Homeताज्या बातम्याअहमदनगर

आ. काळेंच्या पुढाकारातून ‘महाराजस्व’ला गती : शिंदे

कोपरगाव : आ. आशुतोष काळे हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मागील

कारखान्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार
आमदार आशूतोष काळे यांनी पाच कोटी बाबत दिशाभूल करू नये- उपनगराध्यक्ष कुरेशी
राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे

कोपरगाव : आ. आशुतोष काळे हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मागील सहा वर्षांपासून जनता दरबाराच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांतील प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावले जात आहेत. महायुती शासनाच्या ‘महाराजस्व’ अभियानाला कोपरगाव मतदारसंघात गती दिल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून त्यांचा मोठा त्रास वाचला आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे यांनी केले.पोहेगाव येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते होत्या. यावेळी कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचे प्रशासकीय प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून यापूर्वी कोकमठाण, पुणतांबा, सुरेगाव, रवंदे व दहेगाव बोलका मंडळात महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरे घेण्यात आली होती. नुकतेच दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची होणारी धावपळ टळली.यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, आरोग्य विभागाचे डॉ. वाडेकर, कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे, शंकरराव चव्हाण, वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, देवेन रोहमारे, बाबुराव थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS