महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उध्दारक व सत्यशोधक समाजाचे प्रणेते, अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि सा
महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उध्दारक व सत्यशोधक समाजाचे प्रणेते, अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि सामानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोेतिबा फुले यांची जयंती. महात्मा जोेतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्हयातील कटगुण या गावी झाला. वडिलांचे नाव गोविंदराव फुले आईचे नाव चिमणाबाई फुले वडिलांचा व्यवसाय फुले विक्रीचा. जोेतिबांनी प्राथमिक शिक्षणानंतर काही काळा भाजी विक्री व्यवसाय केला. ज्योतिबाला मिशनर्यांच्या इंग्रजी शाळेत टाकले. इंग्रजी शाळेत जाऊन ती भाषा चांगली समजू लागल्यावर त्यांनी ’राईट ऑफ मॅन’ मानवी हक्क हे इंग्रज लेखकांचे थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या जातीतील मुलामुलीचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. वयाच्या 12 व्या वर्षी जोेतिबांचा सावित्रीबाई सोबत विवाह झाला. समाजात चालणारी उच्च निच्छ प्रथा जोेतिबांचा या प्रथेला विरोध होता. स्त्रियांवरील होणारे आत्याचार स्त्री ही एक भोग वस्तूच ठरवल्या जाणार्या काळात जोेतिबा फुले पेटून उठले होते. त्या काळात मुलीच्या शिक्षणाला फारशी किंमत नव्हती समाजातील उच्चवर्णीय गणल्या जाणार्याच्यातही स्त्री शिक्षणाविषयी अनास्थाच होती. अशा प्रकारे सर्वसाधारण समाजाची स्थिती मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत वाईटच होती. मुलींनी शिकावे म्हणून त्यांनी इ. स. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा स्थापन करुन स्त्री शिक्षणाचे दारे उघडे केले. सत्य हेच मानवी जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे, असा विचार देणारे महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. परंपरागत जातिव्यवस्था, गुलामगिरी, अज्ञान यांविरुद्ध बंड करणारे पहिले कृतिशील समाजसुधारक होते. 24 सप्टेंबर इ.स.1873 रोजी महात्मा ज्येातिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. बहुजन समाज गुलामीच्या जोखडातून मुक्त व्हावं. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. आणि शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. समाजाने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. स्त्री स्वातंत्रयासाठी स्वत:च आयुष्य धोक्यात घालून स्त्रियांना शिक्षणाचे दारे उघडे केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या पत्नीला आपल्या बरोबर खांदयाला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतले. ज्योतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. आणि सावित्रीबाई देशातल्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका बनल्या. अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी शिक्षण, विधवा विवाह, आणि अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या या पुरोगामीपणाकरता त्यांचा अतिशय छळ केला. पण कोणत्याही अडचणींनी या फुले दाम्पत्य आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाही. स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी नेटाने आणि ध्येयाने खुपच पुढे नेले. शिक्षणाचे महत्त्व शिकणं हेच खरं बळ आहे. शिक्षणानेच माणूस अज्ञान, अंधश्रद्धा आणि शोषणातून मुक्त होऊ शकतो, हे त्यांचे ठाम मत होते. सावित्रीबाई फुलेंच्या सहकार्याने त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करून सामाजिक क्रांतीच घडवली त्यांनी शोषित आणि वंचितांना आपला अधिकार ओळखायला शिकवलं महात्मा फुले यांचा आदर्श म्हणजे अंधश्रद्धा, भेदभाव, आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं. त्यांची शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. आज महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्याची सुरूवात ज्या आधुनिक महापुरूषाने करून दिली ती व्यक्ती म्हणजे भारतातील आधुनिक समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. स्त्रिया डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, शास्त्रज्ञ आणि नेते म्हणून कार्य करत आहेत. यामागे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य आहे. त्यांनी दाखवून दिले की शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. म्हणूनच आपण त्यांच्या कार्याचा आदर करून स्त्री शिक्षणाचा संदेश पुढे नेला पाहिजे.
जोेतिबा फुले शिक्षणाचे महत्व पटवून देताना आपल्या परखड लेखनीतून व्यक्त करतात. विदयेविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्तविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविदयेने केले॥ यावरुन जोेतिबांच्या कार्याची तळमळ आपल्या लक्षात येते, विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला मुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याची ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत अनुमान होते. त्यांनी लिहिलेल्या.’ शेतकर्यांचा असूड ’या पुस्तकातून शेतकर्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली. आपल्या लेखणीतुन रेखाटून एक विशाल दुरदृष्टीतून क्रांतिकारक म्हणून इथे ज्येातिरावांचे दर्शन घडते. अशा थोर समाजसेवक आणि समाजसुधारकाचे नाव आणि त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
श्रीकांत मगर
मो : 9689117169

COMMENTS