Homeताज्या बातम्यासंपादकीय

एआयडीएमके आणि भाजप युतीला सुरूंग का?

तामिळनाडूचे राजकारण हे तेथील सामाजिक आंदोलनाच्या पायावर उभे आहे. सामाजिक आंदोलनाचा पाया हाच बहुजनांचा अर्थातच ब्राह्मणेतरांच्या आत्मसन्मानाच्या आ

आत्मस्तुतीत रमलेला अर्थसंकल्प !
हा सांस्कृतिक गुन्हाच ! 
महिलांचा एल्गार ! 

तामिळनाडूचे राजकारण हे तेथील सामाजिक आंदोलनाच्या पायावर उभे आहे. सामाजिक आंदोलनाचा पाया हाच बहुजनांचा अर्थातच ब्राह्मणेतरांच्या आत्मसन्मानाच्या आंदोलनावर उभा आहे. त्यामुळे तेथील राजकारण देखील ब्राह्मणेतर समाजाच्या आणि खास करून ओबीसी समाजाच्या हातात एकवटले आहे! या सामाजिक पार्श्वभूमी पेक्षा वेगळी भूमिका तमिळनाडूत घेताच येऊ शकत नाही; याची जाण द्रविड मुनेत्र कझगममधून बाहेर पडलेल्या अन्नाद्रमुक च्या दुसऱ्या गटाला झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेली युती, तोडण्याची घोषणा केली आहे. अर्थात, राजकारणामध्ये युती – आघाडीतून बाहेर पडण्यासाठी कारणांपेक्षा निमित्त अधिक महत्त्वाचे असते! यावेळी अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी यांनी तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णादुराई आणि जे. जयललिता यांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य केल्याचा आरोप करून, ही होती तोडत असल्याची घोषणा केली. परंतु, एआयडीएमके ची युती तुटणं, हे भारतीय जनता पक्षाला आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड जिव्हारी लागले आहे. कारण फार मोठ्या प्रयत्नांनी नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील ब्राह्मणेतरांना आणि त्यांच्या धर्मगुरूंना देखील सेंगोल च्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले असताना, राजकारणात मात्र त्याचा फायदा होणार नसेल तर, ते मोदी यांच्यासाठी फार महत्त्वाचे नाही. शिवाय आज देशामध्ये तामिळनाडूतील डीएमके हा पक्ष ब्राह्मणेतरांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला आणि खास करून त्यांच्या ब्राह्मणी संस्कृतीला आव्हान निर्माण करीत आहे. त्यामुळे तामिळनाडूतील मुख्यमंत्री यांची लोकप्रियता दक्षिण भारताकडून उत्तर भारताकडे पसरू लागेल आणि ते आव्हान मात्र भारतीय जनता पक्षालाच नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील प्रचंड डोईजड होणार याचे संकेत दिसतात. त्यामुळेच तामिळनाडूतील राजकीय पक्षांपेक्षाही या सांस्कृतिक भूमीला आपल्या बाजूने काही प्रमाणात कसे ठेवता येईल, याची बैठक  भारतीय जनता पक्षाची युती करण्याच्या मागे आहे. त्यामुळेच या पक्षाची युती तुटण्याविषयी भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा बरोबर एनडीए आघाडीमध्ये असलेले अनेक मोठे पक्ष यापूर्वीच बाहेर पडले आहेत. त्यावेळी एवढा गहजब भाजपमध्ये झाला नाही. तो आता एआयएडीएमकेच्या बाहेर पडण्यातून होत आहे.  काही जण म्हणतात की, ही युती पुन्हा पूर्ववत होईल. परंतु तामिळनाडूची सामाजिक पार्श्वभूमी हे ब्राह्मणेतर स्वाभिमानाच्या आंदोलनाची असल्याने, दोन प्रतिस्पर्धी पक्षांना एका समान वैचारिक भूमिकेतच राहावे लागते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशी एआयडीएमकेने तोडलेली युती ही पूर्ववत होईल, याची संभावना फारच थोडी आहे! कारण, उत्तर भारतात तामिळनाडूतील राजकारण केवळ राजकारणासाठी नसते, तर, तेथील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा ठरतो. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ज्या पद्धतीने ब्राह्मणेतरांची भूमिका आक्रमकपणे राबविण्यास सुरुवात केली आहे, त्याचा अप्रत्यक्ष पगडा त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावर होणं स्वाभाविक आहे! अर्थात डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष एकाच पक्षाचे दोन भाग आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून संघर्ष असला तरी, सामाजिक पार्श्वभूमीवर अधिक लक्ष द्यावे लागते; हे तमिळनाडूच्या राजकारणाचे अंगीभुत वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सेनगोलच्या माध्यमातून तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आपली शक्ती निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालवला होता किंवा आहे, त्याला एआयडीएमकेच्या बाहेर पडण्याच्या कारणास्तव सुरूंग लागला आहे.

COMMENTS