Homeताज्या बातम्या

गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम उत्साहात; चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता आ

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने कैद्यांच्या पुनर्वसनाला नवी दिशा; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेशी सामंजस्य करार
टाकळी प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करा! निष्पाप तरुणाचा मृत्यू अत्यंत वेदनादायी: खा. बजरंग सोनवणे
ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाविरोधात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम पार पडल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

सकाळच्या सत्रात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझी शाळा-स्वच्छ सुंदर शाळा’, ‘स्वच्छता अभियान-माझी जबाबदारी’, ‘स्वच्छतेचे महत्त्व’ आणि ‘महिला सक्षमीकरण’ या विषयांवर निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून माईज गार्डन, खेळाचे मैदान व परिसर स्वच्छ केला. ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.

दुपारच्या सत्रात आयोजित चित्रकला स्पर्धेत लँडस्केप व मेमरी ड्रॉइंग या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रांद्वारे आपली कल्पकता आणि उत्कृष्ट रंगसंगती सादर केली. त्यानंतर गौतम पब्लिक स्कूल इलेव्हन व अश्वमेध फुटबॉल क्लब यांच्यात रंगतदार फुटबॉल सामना झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.

समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत प्राचार्य नूर शेख यांनी मार्गदर्शन केले. चैताली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फिजिकल ट्रेनर रमेश पठारे, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, सर्व हाऊस मास्टर्स व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS