Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

प्रियकराची हत्या; मृतदेह ड्रममध्ये टाकून फेकला नाल्यात

मुंबई : मुंब्रा परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेने स्वतःच्या पती आणि भावाच्या मदत

ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध दोषारोप निश्‍चितजुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातसर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय


मुंबई : मुंब्रा परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेने स्वतःच्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याचा आरोप असून, त्यानंतर मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव अरबाज मकसून अली खान असे असून तो मुंब्रा परिसरातील रहिवासी होता. तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला होता; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला, पण त्याचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अरबाजच्या दूरध्वनी संपर्कांची माहिती, हालचाली आणि भ्रमणध्वनीचे ठिकाण यांचा तपशील तपासण्यात आला. तपासादरम्यान अरबाज शेवटचा वर्सोवा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्याच भागात मेहजबीन शेख नावाच्या महिलेचेही ठिकाण आढळल्याने पोलिसांचा संशय तिच्याकडे वळला. पोलिसांनी मेहजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, मेहजबीनने तिचा पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांच्यासोबत मिळून अरबाजकडून पैसे उकळण्याचा कट आखला होता. त्यासाठी अरबाजला वर्सोवा परिसरात बोलावण्यात आले. तेथे पैशांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. अरबाजने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला पकडून मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

COMMENTS