Homeताज्या बातम्यादेश

’जवान’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

नवी दिल्ली ः अभिनेता शाहरूख खानचा जवान हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. मात्र प्रदर्शनाच्या एक दिवस आधी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी घात

डॉ. सिताराम कोल्हे यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती  
पुणतांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोणाची होणार निवड ?
कुराणासंबंधीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली ः अभिनेता शाहरूख खानचा जवान हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. मात्र प्रदर्शनाच्या एक दिवस आधी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी घातली जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ’जवान’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री नयनतारा हिच्यासोबत तिरुपती येथील श्री व्यंकटेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडीओमुळे शाहरुकला ट्रोल केले जात आहे. काही नेटकर्‍यांनी त्याच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शाहरुखने जवान हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिरुपती बालाजी आणि वैष्णो देवी मंदिरात जाऊन माथा टेकवला. ते पाहून नेटकर्‍यांनी शाहरुखला चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने ’तुला तुझा सिनेमा येण्याआधीच हिंदू मंदिरे दिसतात’ असे म्हणत जवान चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एका यूजरने ’बंद करा हे सगळे. आमची मंदिरे तुझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याचे स्टुडीओ नाहीत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तुला हिंदू मंदिरे दिसतात का?’ असे म्हणत शाहरुखला चांगलेच सुनावले आहे.

COMMENTS