Homeताज्या बातम्यासंपादकीय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 

भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी नुकत्याच आपल्या भाषणात न्यायाधीशांच्या परिषदेत बोलताना अंतर्मुख करणारे विचार मांडले आहे. त्यांन

कंत्राटी भरती आणि आरोप-प्रत्यारोप! 
राजकीय किंमत न चुकवण्याची खेळी !
ऐतिहासिक स्वप्नांची राख रांगोळी!

भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी नुकत्याच आपल्या भाषणात न्यायाधीशांच्या परिषदेत बोलताना अंतर्मुख करणारे विचार मांडले आहे. त्यांनी म्हटले की, देशामध्ये कितीतरी माणसं जी निरपराध आहेत; कुठल्यातरी एखाद्या किरकोळ बाबीवरून त्यांना तुरुंगात जावे लागते आणि वर्षानुवर्ष तुरुंगात ते अक्षरशः खितपत पडलेले आहेत

 त्यांना सोडवण्यासाठी त्यांचे कुटुंब देखील पुढे येत नाही. याचे कारण की, आपल्या कुटुंबातील करता सदस्य कुणालातरी एखादी थापड लगावल्यामुळे तुरुंगात गेला. तर, त्याला सोडवण्यासाठी जर आपण गेलो तर, आपले घर, जमीन, जे काही आहे स्वतः जवळ जगण्याचं किंवा उदरनिर्वाच साधन आहे ते देखील आपल्याजवळ राहणार नाही! या भीतीने आपल्या कुटुंबातील सदस्याला सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही; असं सांगून त्यांनी कोण आहेत ही लोकं, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याबरोबरच तुम्ही ज्ञानी आहात. जाणकार आहात. मी काही बोलावं यापेक्षा तुम्ही समजून घ्यावं. हे जास्त महत्त्वाचे आहे. मला यावर बोलावं लागू नये, असं सांगून त्यांनी तुम्ही मी जे बोलले नाही ते समजून घ्यावं, असं आव्हानच या न्यायाधीशांच्या परिषदेत केलं. खासकरून त्यांनी ओरिसा आणि झारखंडमध्ये गव्हर्नर म्हणून काम करण्याचा जो अनुभव मिळाला, त्याचबरोबर ओरिसामध्ये स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन असताना त्यांनी जो अनुभव घेतला; त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी आपले बरेच अहवाल त्या-त्या सरकारांना सादर केले. त्यामध्ये तुरुंगात खितपत पडणारी माणसं ही सर्वसामान्य माणसे आहेत. विशेषत: ज्या खालच्या तळागाळातून, समुदायातून ते येतात, खासकरून आदिवासी समुदायातून वर्षानुवर्ष कुठलेही कारण नसताना त्यांना अक्षरश: तुरुंगात सडावे लागत आहे! अशी परिस्थिती असताना देशात पुन्हा तुरुंग आणखी बांधण्याचा, जो काही कार्यक्रम हाती घेतला जातो आहे, हा कशासाठी? आपण जगाच्या दृष्टीने पुढे जात आहोत की आणखी मागे? जग पुढे जात असताना आपण जर तुरुंग बांधत असू तर आपण जगाच्या खूप मागे जात आहोत, असं त्यांनी अतिशय तळमळीने या भाषणांमध्ये सांगितलं. याचाच अर्थ तुरुंग बांधून आपण सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला जे निरपराध आहेत अशा लोकांना त्यामध्ये डांबण्याची व्यवस्था करतो आहे काय? असा एक अध्याऱ्हूत प्रश्नही त्यांनी या निमित्ताने समोरच्या न्यायाधीश परिषदेला केला. राष्ट्रपती द्रौपदी मुरमुरे यांनी कोणत्याही लिखित भाषणाला न वाचता आपलं मन उस्फूर्तपणे अनुभवाच्या आधारे मोकळे केलं या सर्वसामान्य जनतेला आपण तुरुंगाच्या चार भिंतीआड कोंडून ठेवलेला आहे. त्यांचा गुन्हा तरी काय? केवळ रागाच्या भरात कोणाला तरी थापड मारली, रागाच्या भरात कोणाला तरी शिवी दिली, तर त्यांच्यावर इतकी जालीम कलमे आपण लावून ठेवलेली आहेत की, त्यांची सुटकाच होत नाहीये. कुटुंब आपलं जगण्याचे किंवा उदरनिर्वाचही साधन कदाचित कोर्टाच्या या लढाईमध्ये हिरावल जाईल किंवा संपवलं जाईल, अशा भीतीने आपल्याच कुटुंबातील सदस्यांना सोडविण्यासाठी पुढे येत नाही. ही परिस्थिती आपण सर्वजण जाणते, ज्ञानी न्यायाधीश म्हणून आपण सगळ्यांनी ओळखायला हवी. या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण आपली भूमिका कशी निभावली पाहिजे, या संदर्भातही तुम्ही काहीतरी ठरवणे गरजेचे आहे, असं थेट आव्हानही त्यांनी न्यायाधीश परिषदेला केले. आज पावतो शक्यतो राष्ट्रपतींचे भाषण हे फार तर लिखित भाषण वाचून दाखवण्याचा प्रकार घडला. किंवा उपस्थित परिषदेला त्या त्या अनुषंगाने बोलण्याचं वख वेळ निभावून नेण्याचे काम झालं. परंतु, आज महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अखिल भारतीय न्यायाधीशांच्या परिषदेलाच अंतर्मुख  करण्याइतपत आपले गंभीर विचार मांडले आहेत. त्यामुळे या परिषदेचा येत्या काळात न्यायव्यवस्थेवर ही एक प्रकारे परिणाम झालेला दिसेल यात शंका नाही!

COMMENTS