Homeमुंबई - ठाणे

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला टॅक्सी जीपची जोरदार धडक, ८ जण जखमी

मुंबई/नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळ आज एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला टॅक्सी जीपने

समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात
बस-फॉर्च्युनरच्या टक्करमध्ये ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी
भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
Horrific accident on the Mumbai-Nashik Highway; taxi-jeep rams into a stationary container; 8 injured.

मुंबई/नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळ आज एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला टॅक्सी जीपने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी जीप महामार्गावरून जात असताना सोनाळे गावाजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरचा चालकाला अंदाज आला नाही आणि जीप थेट कंटेनरवर जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की टॅक्सी जीपच्या पुढील भागाचा मोठा चक्काचूर झाला आहे.

अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS