भातकुडगाव फाटा : घुले पाटील नावाच्या ब्रह्मगिरीतून नेवासा-शेवगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा उदयास आल्याने शेतकरी-कष्टकरी आर्थिक-शैक्षणिक दृष्ट्या भक्कम झाला. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे आधार तीर्थ, शिक्षण प्रेमी, आदर्श पिता, कुशल संघटक, परमार्थ प्रेमी आणि आदर्श राजकारणी होते असे प्रतिपादन श्रीक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी केले. भेंडा(ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी (दि.८) भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास मध्ये आयोजित कीर्तनात ते बोलत होते. प्रारंभी ज्ञानेश्वर कदम महाराज, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले, संचालक माजी आ.चंद्रशेखर घुले, माजी आ. पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, ऍड.देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितिन पवार व इतर मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.कदम महाराज पुढे म्हणाले की, पंढरीच्या विठ्ठलाची वारी करणे आणि त्याचा वारकरी होणे, ही या जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. पायी चालल्याशिवाय वारी घडत नाही.लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी साखर कारखान्याला ज्ञानेश्वर माऊलींचे नाव दिले, त्याच बरोबर कारखान्याच्या गेटसमोर माऊलींचे मंदिर ही बांधले. कारखान्याला माऊलींचे नाव असल्यामुळे अल्कोहोल निर्मिती केली मात्र दारू निर्मिती केली नाही,यावरून त्यांचे परमार्थ प्रेम दिसून येते. घुले पाटील परिवार हा पारमार्थिक परिवार आहे.घुले पाटलांचा विचारांचा आणि विकासाचा वारसा नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील ही राम-लक्ष्मणाची जोडी पुढे नेत आहेत.यावेळी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज, श्रीसदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजूर्के, रामनाथ महाराज काळेगावकर, रमेशानंदगिरी महाराज, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, डॉ.नारायण म्हस्के, जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे आदींसह उस उत्पादक शेतकरी, विविध संस्थाचे पदाधिकारी, सभासद, कारखान्याचे अधिकारी व कामगार उपस्थित होते.

COMMENTS