स्किन ॲलर्जीने त्रस्त ? करून पहा हे घरगुती उपाय.

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

स्किन ॲलर्जीने त्रस्त ? करून पहा हे घरगुती उपाय.

स्किन ॲलर्जीने त्रस्त ? करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

आपल्या घरातील रोजच्या वापरातील अनेक पदार्थ त्वचेच्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी उपयुक्त ठरतात. स्किन ॲलर्जी(Skin allergy) ही जरी कॉमन समस्या असल

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा लग्न करणार
अतिक्रमण धारकांवर नगरपरिषदेचा हातोडा
स्वराज्य संघटना नाशिक च्या वतीने श्री छत्रपती संभाजी चौक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्त पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

आपल्या घरातील रोजच्या वापरातील अनेक पदार्थ त्वचेच्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी उपयुक्त ठरतात. स्किन ॲलर्जी(Skin allergy) ही जरी कॉमन समस्या असली तरी ती झालेल्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. कोणाला एखादा विशिष्ट पदार्थ खाल्यामुळे ॲलर्जी होते तर कोणाला एखाद्या सौंदर्य प्रसाधनां(Cosmetics) च्या वापरामुळे हा त्रास सहन करावा लागतो. फूड ॲलर्जी(Food allergy) आणि सौंदर्य प्रसाधनां(Beauty products) मुळे होणारी ॲलर्जी या दोन्हींमध्ये खूप फरक असला तरी त्याच्यामुळे होणारा त्रास तितकाच अधिक असतो. पण कधीकधी घरगुती उपायांनीही  ही समस्या, त्याचा त्रास कमी होऊ शकतो. जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात..

१. टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईलमध्ये अनेक ॲंटी-ऑक्सीडेंट्स(Anti-oxidants) असतात, जे त्वचेला झालेल्या ॲलर्जीला(Allergies) आतून दुरूस्त करतात. त्यामधील ॲंटीबॅक्टेरिल(Antibacterial) आणि ॲंटी इन्फ्लामेट्री(Anti-inflammatory) घटकांमुळे स्किन ॲलर्जीचा(Skin allergies) त्रास दूर होण्यास मदत होते. त्वचेवरील लालसरपणा,(Redness) रॅशेस(Rashes) हे सर्व दूर करायचे असेल तर दिवसभरात दोनवेळा तरी  टी ट्री ऑईल (Tea tree oil)जरूर लावावे. बाजारात हे ऑईल सहज उपलब्ध आहे. 

टी ट्री ऑईलमध्ये अनेक ॲंटी-ऑक्सीडेंट्स असतात
त्वचेवरील लालसरपणा, रॅशेस दूर करायचे असेल तर टी ट्री ऑईल लावावे.

२. व्हिनेगर

घरगुती उपायांनी स्कीन ॲलर्जीची समस्या सोडवायची असेल तर ॲपल साइडर व्हिनेगर(Apple Cider Vinegar) चाही उपयोग करू शकता. त्यामधील अनेक महत्वपूर्ण घटकांमुळे ते एक स्किन केअर एजंट बनले आहे. अंघोळ करताना पाण्यात थोडे ॲपल साइडर व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने स्नान केल्यास ॲलर्जी दूर होते.

स्कीन ॲलर्जीसाठी ॲपल साइडर व्हिनेगर उपयोग करणे .

३. नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेसाठी खूप गुणकारी आहे. त्यामधील ॲंटी-बॅक्टेरियल(Anti-bacterial) गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या सहजपणे दूर होतात. तसेच त्यातील मॉइश्चरायझिंग(Moisturizing) गुणांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.  एका वाटीत थोडे नारळाचे तेल घेऊन ते गरम करावे. तेल कोमट झाल्यावर ते त्वचेवर लावून हलक्या हाताने मालिश करावे व थोडा वेळ तसेच राहू द्यावे. नारळाच्या तेलामुळे स्कीन ॲलर्जी हळूहळू कमी होईल.

नारळाचे तेल त्वचेसाठी खूप गुणकारी  मॉइश्चरायझिंग गुणांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते नारळाच्या तेलामुळे स्कीन ॲलर्जी कमी होण्यास मदत होते .

COMMENTS