HomeUncategorized

राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान

कराड / प्रतिनिधी : राजमाची (ता. कराड) येथिल सूर्यकांत पाटील यांच्या शिवारात रात्रीच्या अंधारात रानडुक्कर विहिरीत पडले. सकाळी शेतकरी शेतात खत घा

आरटीईतून मान्यताप्राप्त शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक : विनय गौडा
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री यमाईदेवीचा रथोत्सव
पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत-जास्त झाडे लावावीत : ना. रामराजे नाईक-निंबाळकर

कराड / प्रतिनिधी : राजमाची (ता. कराड) येथिल सूर्यकांत पाटील यांच्या शिवारात रात्रीच्या अंधारात रानडुक्कर विहिरीत पडले. सकाळी शेतकरी शेतात खत घालण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात काही तरी पडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहीरीत वाकून पाहिले असता रानडुक्कर असल्याचे दिसून आले.
विहिरीत एक भले मोठे रानडुक्कर एका काठाला पाण्यात आधार घेऊन बसले होते. बिन बांधीव विहीर व पंधरा फूट खोल असल्याने डुक्करला बाहेर येणे शक्य नव्हते. सुर्यकांत पाटील यांनी तात्काळ वन विभागास कळविले. वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक उत्तम पांढरे हे तात्काळ पिंजरा व जाळ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. वाघर / जाळी विहिरीत सोडून सदर रान डुक्करास यशस्वीरित्या बाहेर काढले.
सदरील डुक्कर हे नर जातीचे साधारण 60 किलो वजनाचे होते. हे डुक्कर सुस्थितीत असल्याची तपासणी खातरजमा करून त्याला त्याच्या सुररक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक तूषार पांढरे, वनमजुर हणमंत शिंदे, योगेश बेडेकर, भरत व राजमाचीचे स्थानिक ग्रामस्थ सूर्यकांत पाटील व अथर्व चन्ने यांनी सदर रानडुक्कराला जीवदान दिले.

COMMENTS