Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाने माता-पिता छत्र हरपलेल्यांना माणच्या शिक्षकांची भरीव मदत

दहिवडी : कोरोनाने पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना ठेव पावती प्रदान करताना मान्यवर. (छाया : विजय भागवत) गोंदवले / वार्ताहर : आदर्श समाज घडविण्याच

उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात
सातार्‍यात सुपर मार्केटमधील वाईन विक्री विरोध व्यसन मुक्त युवक संघाचे दंडवत-दंडुका आंदोलन
सुपने विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा एकहाती विजय

गोंदवले / वार्ताहर : आदर्श समाज घडविण्याचे व समाजाला आदर्श घालून देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात. असाच एक आदर्श माणमधील सातारा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी समाजापुढे ठेवला आहे. संवेदनशील मनाच्या व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात माता पिता छत्र हरपलेल्या मुलांना आर्थिक मदत केली आहे.
शिक्षक हा चांगल्या वाईट कारणाने नेहमीच चर्चेत असणारा व समाजाशी सातत्याने संपर्कात असणारा घटक आहे. कोरोना काळात तर अनेकदा शासनाच्या विविध धोरणामुळे मेटाकुटीस आलेले शिक्षक आपण पाहिले आहेत. पण या परिस्थितीत आपण समाजाचे देणे लागतो ही भावना त्यांच्यात जागृत आहे. शिक्षकांनी यातून पूर्ण काळात गरज असताना 10 जम्बो ऑक्सिज सिलेंडर शासनाला दिले. यासोबतच वैयक्तिक रुग्णासाठी ऑक्सिजन दिले. त्यानंतर अजून काय करता येईल यावर शिक्षकांच्या विचारविनिमय सुरू होता. कोणी रुग्णवाहिका देऊन, नंतर कोणी औषध घेऊ म्हणत या सर्व चर्चेनंतर जिल्हा परिषद शाळांमधील अशी मुले ज्यांचे वडील व आई अथवा आई-वडील दोघेही कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. अशा मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिक्षण निधी गोळा केला. 39 मुलांना प्रत्येकी 11 हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीतून प्रत्येक मुलांचे नावे पोस्टात ठेव पावती करण्यात आली आहे. या सर्व ठेव पावतीचे वितरण माणचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्ताराधिकारी सोनाली विभूते, रमेश गंबरे व संगीता गायकवाड तसेच केंद्रप्रमुख नारायण आवळे, अंकुश शिंदे, सतीशकुमार माळवे, शिक्षक बॅकेचे व्हा. चेअरमन महेंद्र आवघडे, भरतेश गांधी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS