Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; बिल्डरसह डेव्हलपरना 3 वर्ष कारावासासह दंडाची शिक्षा

सातारा / प्रतिनिधी : न्यायालयाने दिलेल्या आदेशाला कचर्‍याची टोपली दाखविणार्‍या वाई येथील पालन न करणार्‍या बिल्डर व डेव्हलपर राहुल मधुकर गुजर व रोहित

कारमधून आलेल्या टोळक्याकडून उंडाळे येथील युवकाचे अपहरण; कोल्हापूर-सांगलीच्या 10 जणांना अटक; पाच दिवस पोलीस कोठडी
मायणीच्या यशवंत विकास सोसासटीत गुदगे गटाकडून येळगावकर गटाचा धुरळा
माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा / प्रतिनिधी : न्यायालयाने दिलेल्या आदेशाला कचर्‍याची टोपली दाखविणार्‍या वाई येथील पालन न करणार्‍या बिल्डर व डेव्हलपर राहुल मधुकर गुजर व रोहित मधुकर गुजर या दोघांना 3 वर्षे तुरुंगवास व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ग्राहक न्यायालयाने सुनावली. या घटनेने बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍यांनी ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्यास बिल्डर व डेव्हलपर यांनाही शिक्षा होवू शकते हे अधोरेखित झाले.
वाई सातारा येथील बिल्डर व डेव्हलपर राहुल मधुकर गुजर व रोहित मधुकर गुजर यांनी मौजे सोनगीरवाडी, ता. वाई, जि. सातारा येथे मधुविश्‍व हाईटस या नावाने बहुमजली आरसीसी इमारत बांधण्याची जाहीरात केली होती. तेथील पहिल्या मजल्यावर फ्लॅट नं. एफ-02 चे साठेखत ग्राहक अनिल अर्जुन गलगले यांचेसोबत केले होते. मात्र, सदर फ्लॅट विक्रीपोटीची सर्व रक्कम ग्राहकांकडून घेऊन त्यांना इमारतीचे बांधकाम पूर्ण करून फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे अनिल अर्जुन गलगले यांनी ग्राहक न्यायालय सातारा येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीचा निकाल ग्राहकाच्या बाजूने लागला व न्यायालयाने दि. 8 मे 2017 पासून ग्राहकास रूपये 10 लाख 60 हजार रुपये रक्कम हाती पडेपर्यंत व्याजासह 9% ने अदा करावेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम 5 हजार रूपये 45 दिवसात द्यावेत, असे आदेश केले होते. मात्र, या बिल्डरांनी ही रक्कम अदा केली नाही. त्यामुळे अनिल अर्जुन गलगले यांनी बिल्डर व डेव्हलपरने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. म्हणून ग्राहक न्यायालय सातारा येथे फिर्याद याचिका दाखल केली. या फिर्यादीचा निकाल देताना कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही. म्हणून बिल्डर व डेव्हलपर राहुल मधुकर गुजर व रोहित मधुकर गुजर यांना दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी 3 वर्षे तुरूंगवासाची व प्रत्येकी 5 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास 6 महिने प्रत्येकी साध्या कैदेची शिक्षा ग्राहक न्यायालय, सातारा चे अध्यक्ष मिलींद भिमराव पवार (हिरगुडे), सदस्य दिनेश शंकर गवळी व सदस्य राहुल प्रकाश पाटील यांनी सुनावली. हा निकाल ग्राहकाच्या बाजूने झाल्यामुळे ग्राहकांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहक न्यायालय सातारा यांच्याकडून न्याय मिळाल्याबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. प्रस्तुत ग्राहक/फिर्यादी अनिल अर्जुन गलगले यांच्या वतीने अ‍ॅड. विकास प्रल्हाद जगदाळे यांनी काम पाहिले. यांना अ‍ॅड. ऐश्‍वर्या सतीश आगुंडे यांनी सहकार्य केले.

COMMENTS