आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

आज १६ सप्टेंबर

मेष : मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावर

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष : मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. शुभ रंग गुलाबी शुभ अंक ९

वृषभ :- ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. आवडीची कामे करायला वेळ मिळेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग पोपटी शुभ अंक ५

मिथुन :-अवास्तव चर्चा करू नका. सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा. घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल. आपली हौस पूर्ण करून घ्याल. शुभ रंग विटकरी शुभ अंक १

कर्क :- जोडीदाराच्या वर्तनाने ताण वाढू शकतो. सरसकट एकच विचार करू नका. हातातील कामात यश येईल. बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल. शुभ रंग जांभळा शुभ अंक  ३

सिंह :- बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन बोला. आपलेच मत खरे करायला जाऊ नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील. शुभ रंग लाल शुभ अंक ७

कन्या :- अनावश्यक खर्चाला आवर घालावी लागेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. शुभ रंग निळा शुभ अंक ४

तूळ :- मानसिक तोल ढळू देऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील. शुभ रंग हिरवा शुभ अंक ८

वृश्चिक :- मनातील इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. कामात पळवाट शोधून चालणार नाही. दिवस संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. शुभ रंग पिवळा शुभ अंक ६

धनू :- अनावश्यक सल्ले देऊ नका. मुलांच्या तक्रारी वाढू शकतात. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल. शुभ रंग काळा शुभ अंक २

मकर :- संपूर्ण माहितीशिवाय वक्तव्य करू नका. उगाच जुन्या गोष्टीत उकरून काढत बसू नका. योग्य आहार घ्यावा. घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका. शुभ रंग नारंगी शुभ अंक १

कुंभ :- नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात. मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका. शुभ रंग पांढरा शुभ अंक ६

मीन :- चेष्टा जपून करावी. वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी. आर्थिक बाबीत आततायीपणे वागू नका. बोलताना भडक शब्दांचा वापर करू नका. शुभ रंग काळा शुभ अंक ३

COMMENTS