आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

आज 8 सप्टेंबर

मेष :- गूढ गोष्टीं बद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून सत्कर्म घडेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. सासरच्या व्यक्तींकड

आज १३ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष :- गूढ गोष्टीं बद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून सत्कर्म घडेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. सासरच्या व्यक्तींकडून लाभ संभवतो. शुभ रंग गुलाबी शुभ अंक ६

वृषभ :- मनाची चंचलता वाढू शकते. पूजा-अर्चा मध्ये मन रमवाल. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वापर करा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मिळकतीत वाढ होण्याची शक्यता. शुभ रंग काळा शुभ अंक १

मिथुन :- स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात वाढ करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाची योग्य पावती मिळेल. धन संचयात वाढ होईल. शुभ रंग विटकरी शुभ अंक ९

कर्क :- प्रलंबित कामे सामोरी येतील. भावनात्मक विचार करू नका. चुकीच्या गोष्टींना खत-पाणी घालू नका. दिवस धावपळीत जाईल. कष्टाला पर्याय नाही. शुभ रंग पांढरा शुभ अंक २

सिंह:- देणी चुकती करावी लागतील. विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विरोधक नरमाईचे धोरण स्वीकारतील. शुभ रंग हिरवा शुभ अंक ७

कन्या – बुद्धिमत्तेचा कस लागू शकतो. मनातील इच्छा पूर्णत्वास न्याल. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. मित्रांची मदत घ्यावी लागेल. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा. शुभ रंग निळा शुभ अंक ४

तूळ :- जोडीदाराचा वरचष्मा राहील. हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागावे. फक्त कामावर लक्ष केन्द्रित करा. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. शुभ रंग जांभळा शुभ अंक  २

वृश्चिक – कामाचा मनापासून आनंद घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सहकार्‍यांकडून फार अपेक्षा बाळगू नका. शुभ रंग विटकरी शुभ अंक ५

धनू :- दृष्टीकोनात बदल करून पहावा. सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो. मैदानी खेळाची आवड निर्माण होईल. आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. शुभ रंग पांढरा शुभ अंक ३

मकर :- पत्नीशी वाद वाढवू नका. मुलांची बाजू जाणून घ्या. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमची प्रगती इतरांच्या नजरेत खुपू शकते. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. शुभ रंग नारंगी शुभ अंक १

कुंभ :- इतरांचा विश्वास कमवावा. भावंडांशी मतभेदाची शक्यता. नवीन संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल. वादाचे मुद्दे टाळावेत. शुभ रंग पोपटी शुभ अंक ५

मीन :- सौम्य शब्दांत मत मांडा. प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा. राजकीय क्षेत्रातून लाभ संभवतो. अति तिखट पदार्थ खाऊ नका. करमणुकीत जास्त वेळ घालवाल. शुभ रंग पिवळा शुभ अंक ३

COMMENTS