Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार तेजीनंतर कोसळला

गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान

मुंबई ः देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या मोसमात शेअर बाजार चांगलाच वधारला होता. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी

शिव प्रहार संघटनेच्या चिथावणीखोर वक्तव्याचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने निषेध नोंदवून कारवाई करण्याची मागणी
विकासकामांवरील स्थगिती अजित पवारांनी उठवली
धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुणांचा राडा

मुंबई ः देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या मोसमात शेअर बाजार चांगलाच वधारला होता. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी असतांना शुक्रवारी काही तासांमध्ये शेअर बाजार धडाधड कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शुक्रवारी सकाळी शेअर बाजारमध्ये चांगलीच तेजी होती. मात्र शेवटच्या काही तासांमध्ये शेअर बाजाराने अचानक यू-टर्न घेतला आहे.
शेअर बाजाराची सुरूवात तेजीने झाल्यानंतर दुपारी मात्र शेअर बाजार कोसळल्यास सुरूवात झाली. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 3 कोटी लाख रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्स उच्चांकावरून 1,434 अंकांनी घसरला तर निफ्टीने 22,794 अंकाच्या उच्चांकी पातळीवर माजली मारली होती, जिथून आता निर्देशांक 1.60 टक्के किंवा 400 अंकांनी घसरला आहे. बाजाराच्या या घसरणीचा सर्वाधिक फटका हेवीवेट शेअर्सना बसला ज्यामध्ये रिलायन्स आणि एचडीएफसीच्या शेअर्सचा समावेश आहे. देशातील बड्या कंपन्यांचे समभाग घसरल्याने शेअर बाजार गडगडला. दुपारी 1 वाजता निफ्टी 250 अंकांनी घसरून 22,400 अंकांवर, तर सेन्सेक्स 916 अंकांच्या घसरणीसह 73,695 अंकावर व्यवहार करत होता. तसेच बँक निफ्टी 475 अंकांपेक्षा अधिक घसरल्यानंतर 48,765 पातळीवर आला. यादरम्यान, बीएसईच्या 30 समभागांपैकी 28 समभागांमध्ये मोठी घसरण झाली असून बजाज फायनान्सचा शेअर 2 टक्क्यांनी वधारला, तर भारती एअरटेलचा शेअर सर्वाधिक 2.42 टक्के घसरला. बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून बीएसईवरील सूचिबद्ध कंपन्यांचे मार्केट-कॅप सुमारे तीन लाख कोटींनी घसरून 405.93 लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजे सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध शेअर्सच्या गुंतवणूकदारांना 2.67 लाख कोटींचा फटका बसला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 75,000 अंकांची पातळी ओलांडली तर निफ्टीने लाइफ टाइम हाय गाठल्यानंतर सेन्सेक्सने अवघ्या 1,450 अंकांपेक्षा अधिकने खाली उडी घेतली ज्यामुळे या काळात बाजारातील गुंतवणूकदारांचे 7.50 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये जवळपास 3% घसरण झाली तर एचडीएफसी बँकेचा शेअर 1.30 टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांचा शेअर्स विक्रीचा सपाटा – गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती. मात्र गुंतवणकदारांनी नफा कमावण्यासाठी शेअर्स विक्रीचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजार कोसळल्याचे म्हटले जात आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि त्याचा परिणाम मार्केटवर झाला. आज सर्वाधिक घसरण सीईएटी टायर स्टॉकमध्ये 4.2 टक्के झाली. यासह ज्योती लॅब्सचा शेअर 3.6 टक्के, ब्लू स्टारचा शेअर 3 टक्के, एमआरएफचा शेअर 3 टक्के घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

COMMENTS