पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा फलदायी…. मिळाला १५७ वस्तूंचा खजिना…

Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा फलदायी…. मिळाला १५७ वस्तूंचा खजिना…

प्रतिनिधी : दिल्ली संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष

नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
अखेर मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना… अमेरिकेत करणार ‘ही’ कामे…
कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी : दिल्ली

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. 

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत प्रभावी भाषण दिले. महत्त्वाचे म्हणजे या दौऱ्यात अमेरिकेने भारतातील सुमारे १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या! 

यात शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. त्या वस्तू पुन्हा भारतात येणार आहेत.

या १५७ वस्तूंमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कलाकुसरीच्या आहेत. यात दहाव्या शतकातील ‘रेवंता’ यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, १२व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती आहे. 

शिवाय यातल्या साधारण ४५ कलाकुसरीच्या वस्तू मध्ययुगीन काळातील आहेत. त्यात अनेक बौद्ध, हिंदु आणि जैन धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मूर्ती आहेत. निम्म्याहून अधिक कलाकुसरीच्या वस्तू या भारतीय संस्कृतीच्या द्योतक आहेत.

या सर्व वस्तू धातू, दगड आणि माती किंवा सिरॅमिकच्या आहेत. लक्ष्मी-नारायण, बुद्ध, विष्णू, शिव-पार्वती, २४ जैन तीर्थंकर, कनकलमूर्ती, ब्राह्मी, नंदिकेश अशा देवी-देवतांच्या ब्राँझच्या मूर्तींचा यात समावेश आहे. 

सोबतच, इतरही अनेक देवी-देवता आणि भारतीय पुराणातील व्यक्तीमत्वांच्या मूर्ती यात आहेत. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची प्रतीक असलेली अनेक दुर्मिळ शिल्प आहेत.

COMMENTS