Homeताज्या बातम्या

कै.बाबुराव आडसकर यांना मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्कार जाहीर

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने दिला जाणारा रोटरी भूषण पुरस्कार या वर्षी लोकनेते, माजी आमदार, कै. बाबुराव आडसकर यांना मरणोत्तर रोटरी भ

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज
धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू



रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने दिला जाणारा रोटरी भूषण पुरस्कार या वर्षी लोकनेते, माजी आमदार, कै. बाबुराव आडसकर यांना मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष शकील शेख, सचिव राधेश्याम लोहिया यांनी दिली.
हा पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 26 जुलै रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल परिचय येथे होणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आडसकर कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आपले वेगळे स्थान निर्माण करणार्‍या लोकनेते, माजी आमदार कै. बाबुराव आडसकर यांनी पंचायत समितीचे सभापती ते विधानसभा असा 50 वर्षांचा राजकीय प्रवास केला. 50 वर्षाच्या सक्रिय राजकारणात त्यांच्या हाबाडयाचा धसका जिल्ह्यातील मोठमोठ्या पुढार्‍यांनी घेतला होता. लोकांचे भोवतालचे वलय हीच त्यांच्या राजकारणाची खरी किमया होती. म्हणूनच बाबुराव आडसकर हे लोकनेते म्हणून जनतेच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत होते.  केज तालुक्यातील आडस या गावचे बाबुराव आडसकर हे रांगडे व्यक्तिमत्व, शालेय जीवनापासूनच राजकारणाची त्यांना मोठी आवड होती. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचा स्वीकार त्यांनी केला होता. यशवंतरावांची विचारधारा जोपासून बाबुराव आडसकर काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. केज पंचायत समितीच्या निवडणुकीपासून 1963 साली आपल्या राजकीय जीवनाचा प्रारंभ केला. ते केज पंचायत समितीचे सभापती झाले आणि पुढचे 50 वर्षे त्यांनी राजकारणात कधीही मागे वळून पाहिले नाही. विधानसभा, विधानपरिषद, शिखर बँकेचे संचालक, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वपूर्ण पदे त्यांनी मोठ्या दिमाखाने भूषविली. राजकारणात सामान्य जनतेचा विश्वास आत्मसात करून सभोवती जनसामान्यांचा गराडा ही त्यांची राजकारणाची किमया त्यांना पुढे घेऊन गेली. आपल्या रांगडया व्यक्तिमत्वाने व लोकांना रुचेल अशा फर्ड्या भाषणाने ते मोठमोठ्या सभा गाजवित असत. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याचे असेल ते काम करण्याची प्रवृत्ती त्यांना लोकप्रिय बनवत गेली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरीचे अध्यक्ष शकील शेख, सचिव राधेश्याम लोहिया,उपाध्यक्ष कल्याण काळे, पुरस्कार समितीचे समन्वयक अनंत लोमटे यांनी केले आहे.

COMMENTS