महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर नवीन उभारण्यात आला होता. मात्र, या नवीन पुला

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर नवीन उभारण्यात आला होता. मात्र, या नवीन पुलाच्या एक्सपँशन जॉइंटला (Expansion Joint) अवघ्या दोन दिवसांत दुसऱ्यांदा खड्डे पडल्याने सावित्री पुलावर पुन्हा एकदा गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग विभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १८ वर्षे सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही, ज्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

COMMENTS